Get Mystery Box with random crypto!

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष १४ एप्रिल इ.स.१६६४ (चैत | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

१४ एप्रिल इ.स.१६६४
(चैत्र वद्य प्रतिपदा, शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार गुरुवार)

जसवंतसिंहाचा सुलतानढवा!
जसवंतसिंहाने सुलतानढवा नावाचा हल्ला करून किल्ले सिंहगड जिंकण्याचा प्रयत्न केला मात्र सजग मराठ्यांनी तो पुरता उधळून लावला. जसवंतसिंहाचा किल्ले सिंहगड वेढा बादशाही थाटात सुरूच होता. सुमारे ६ महिने झाले तरी मराठे जसवंतसिंहास दाद देत नव्हते. अखेर "सुलतानढवा" म्हणजे निर्वाणीचा हल्ला केला. तोफांसह मोगलांनी निकराचा हल्ला करून, गड घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चिवट मराठ्यांनी अतिशय तिखट प्रतिकार करून शेकडो मोगल आणि राजपूत कापून काढले, अनेक मोगल सैनिक दारुगोळ्याच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत ठार झाले. त्यामुळे जसवंतसिंहाचे माथे पार भडकून गेले. जसवंतसिंह व रावसिंह हाडा यांच्यातच वाद सुरू झाले. मात्र सुलतानढवा अयशस्वी झाल्यामुळे जसवंतसिंह पुरता निराश झाला.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/7euoCKwtAyw?feature=share

१४ एप्रिल इ.स.१६६५
(वैशाख शुद्ध दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार शुक्रवार)

किल्ले वज्रगड मोगलांच्या ताब्यात!
मुरारबाजींच्या हौतात्म्यानंतर किल्ले पुरंदरचा जुळा भाऊ असलेल्या किल्ले वज्रगडावर दिलेरखानाने हल्ला करून किल्ले वज्रगड ताब्यात घेतला. परंतु मराठी मनगटाची ताकद काय असते, किती चिवट असते हे मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखान यांस कळून आले. ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ जर एक किल्ला घेण्यास लागत असेल तर स्वराज्य घेण्यास किती वेळ लागेल हाच विचार मिर्झाराजे जयसिंग यांनी केला.



१४ एप्रिल इ.स.१६६७
रांगणा किल्ल्याला आदिलशाहीचा वेढा
१४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी ६००० होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो.



१४ एप्रिल इ.स.१६७३
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून किल्ले रायगडाच्या दिशेने आले. हुबळीवर स्वारी करून प्रतापराव गुजरकाकांनी अथनीवर धाड टाकली. कारवार प्रांतात प्रतापरावांनी मांडलेली धूम पाहून बेहलोलखान कोल्हापूर भागात सैन्यांची जमवाजमव करून प्रतापरावांना दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी महाराज खुद्द पन्हाळगडावर मुक्कामी असल्याची वार्ता बेहलोलखानाच्या कानी गेली. त्याचबरोबर पावसळाही जवळ असल्याने खानाने जास्त हालचाल केली नाही.



१४ एप्रिल इ.स.१६८५
विजापुरचा वेढा सुरू असल्याचे औरंगजेब बादशहाला कळविण्यात आले. शके १६०७, क्रोधेन संवत्सरे, रहिमखान बबुरखान (बहादुरखान) रणमस्तखान येऊन विजापुरास वेढा घातला. औरंगजेब बादशहा अहमदनगरलाच होता, त्यास जमादिलावल महिन्याच्या २०, वीस तारखेस म्हणजे आज विजापुरचा वेढा सुरू असल्याचे कळविण्यात आले.


https://youtube.com/shorts/7euoCKwtAyw?feature=share
१४ एप्रिल इ.स.१८९१
#भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला.


YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.