Get Mystery Box with random crypto!

कलम सहाप्रमाणे असणारा संभाजीराजेंचा मुलुख सोडून उर्वरीत काहीसा | " छञपती श्री शिवाजी महाराज "

कलम सहाप्रमाणे असणारा संभाजीराजेंचा मुलुख सोडून उर्वरीत काहीसा मुलुख शाहू महाराज व पेशव्यांनी जिंकून घेतला. त्यातील हिस्सा संभाजीराजेंना दिला नाही. कलम सात पूर्णतः पाळला गेला नाही. कलम आठ काही अंशी पाळला गेला. कलम नऊप्रमाणे मिरज, अथणी तासगाव वगैरे भाग संभाजीराजेंनी शाहू महाराजांच्या स्वाधीन केला नाही.



१३ एप्रिल इ.स.१७३९
सावंतांनी गोव्याच्या जनरलला पाठविलेल्या पत्राची नोंद!
पोर्तुगिजांच्या संगनमताने सावंतांनी बार्देश व्यापिले होते, कारण मराठे बार्देश घेतील अशी भीती पोर्तुगिजांना वाटल्याने, पोर्तुगिजांनीच सावंतांना बार्देश घेण्यास सांगितले होते. ह्या संदर्भात जयराम सावंत व रामचंद्र सावंत या दोघांनी गोव्याच्या गव्हर्नर जनरलला पाठविलेले पत्र बोलके आहे. त्यात ते दोघे म्हणतात, "व्यंकटराव यांची फौज वरघाटी जाईस्तोवर बार्देश आम्हाकडे असावा, तद्नंतर ते तुमचे स्वाधीन करू".


https://youtube.com/shorts/oe-GErXDYrI?feature=share
१३ एप्रिल इ.स.१९१९
जालियनवाला बाग हत्याकांड
जालियनवाला बाग हत्याकांडाच्या उल्लेखाने आजही भारतीयांचे रक्त सळसळते. निशस्त्र शेतक-यांवर ब्रिटिशांनी अमानुष हल्ला केला होता, या घटनेने आजही अंगावर काटा उभा राहतो.
जालियनवाला बाग येथे १३ एप्रिल १९१९ रोजी ब्रिटिश राजवटीविरुद्ध झालेल्या निदर्शनाला १५ ते २० हजार नागरिक जमले होते. जेव्हा नेते भाषण करत होते तेव्हा, ब्रिगेडीअर जनरल रेजीनॉल्ड डायर सैनिकांसह तिथे दाखल झाला. त्या सर्वांच्या हातात रायफल होत्या. शांत आणि निशस्त्र लोकांवर शस्त्र चालवले जाणार नाही अशी नेत्यांची भाबडी आशा पुढच्या काही क्षणात धुळीस मिळाली. ब्रिगेडियर जनरल रेनाल्ड डायर याने ५० बंदुकधारी शिपायांना या नागरिकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. सैनिकांनी बागेला चारही बाजूने वेढा टाकला आणि कोणतीही पूर्व सुचना न देता बंदूकीच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली. डायर याने दहा मिनिटे गोळीबार सुरूच ठेवण्यास सांगितले होते. बंदुकीतील गोळ्या संपल्यानंतर हा गोळीबार बंद करण्यात आला. यावेळी बंदुकांच्या सुमारे १६५० फैरी झाडण्यात आल्या आणि यात सुमारे एक हजार निष्पाप नागरिक बळी गेले तर एक हजार १०० जण जखमी झाले होते. हा आकडा विविध ठिकाणी कमी अधिक दिसतो, मात्र त्यामुळे घटनेचे महत्व आणि क्रूरता कमी होत नाही.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.