Get Mystery Box with random crypto!

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ११ एप्रिल इ.स.१६६७ (चैत | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

११ एप्रिल इ.स.१६६७
(चैत्र वद्य त्रयोदशी, शके १५८९, संवत्सर प्लवंग, वार गुरुवार)

किल्ले रांगणा व परिसर आदिलशाहीकडे!
महाराजांनी याच काळात रांगण्याचा वेढा स्वतःहून उठविला. महाराज आग्रा येथील जीवघेण्या प्रसंगातून सुटून आले होते. सततच्या साऱ्या, लढाया, मोहिमा, युद्धे, जाळपोळ यामुळे रयतदेखील त्रस्त झाली होती. त्यामुळे महाराजांना काही वर्षे शांतता हवी होती. कारण राज्यकारभाराची घडी विस्कळीत झाली असल्याने ती सर्व प्रथम स्थिरस्थावर करून, जनतेच्या मनात स्थैर्य निर्माण करणे आवश्यक होते. त्यामुळे सर्व प्रथम आग्रा येथून निघून आल्याबद्दल औरंगजेब बादशहास दिलगिरी व्यक्त करणारे पत्र लिहून काही अटींवर तह केला. औरंगजेबानेही नाइलाजास्तव हा तह मान्य मान्य केला. कारण इराणच्या स्वारीच्या शक्यतेने औरंगजेब बादशहाची डोकेदुखी वाढली होती. त्याचबरोबर पेशावरी लोकांनी बंड केल्यामुळे, औरंगजेब बादशहाने महाराजांशी संघर्ष टाळून तहास मान्यता दिली. मात्र मोगलांशी तह झाल्यामुळे विजापुरकरांचे पित्त खवळले. त्यामुळे आदिलशाहीने किल्ले रांगणा परत मिळविण्यासाठी बेहलोलखान आणि व्यंकोजीराजे यांना महाराजांच्यावर पाठविले. मात्र महाराजांनी त्वरित तो हल्ला मोडून काढून या दोघांना पिटाळून लावले. मात्र, महाराजांनाही संघर्ष नको होता. तर सध्या शांती हवी होती. त्यामुळे महाराजांनी यावेळी किल्ले रांगणे याचा वेढा स्वतःहून उठविला. आणि विजापुर आघाडी शांत करण्यासाठी हा किल्ला तहांअतर्गत आदिलशाहीस दिला. मात्र, त्याच वेळी दक्षिण कोकण याच तहांअतर्गत स्वतःकडे ठेवण्यास महाराजांना यश आले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/_g9xakmrZps?feature=share

११ एप्रिल इ.स.१६८०
राजापूरकर इंग्रजांनी सुरतला पाठवलेल्या पत्रात म्हणतात."छत्रपती शिवाजी महाराज मरण पावले, त्यांच्या मरणामुळे या भागात पुष्कळ घोटाळा माजेल असे दिसते."



११ एप्रिल इ.स.१६९१
११ एप्रिल १६९१ रोजी नागोजी मान्यास छत्रपती राजाराम महाराजांनी सरदेशमुखाच्या वतनाची सनद दिली. त्यात महाराज म्हणतात, “तुम्ही पूर्वी तांब्रांकडे (मोगलांकडे) होते. ऐसियास स्वामीचे राज्य म्हणजे देवताभूमी. या राज्यास तांब्रांचा उपद्रव न व्हावा, मराठा धर्म रहावा, स्वामीच्या राज्यांची अभिवृद्धी व्हावी या उद्देशाने स्वामींच्या पायापाशी एकनिष्ठा धरून कर्नाटकांत चंदीचे मुक्कामी स्वामीपाशी आले. तिथे येऊन विनंती केली की आपणांस देशात सरदेशमुखीचे वतन करून दिले पाहिजे तेवी तपशील त्यापुढे १२ महालांची नावे दिली आहेत. ऐसियासी तुम्ही स्वामी सेवेवरील एकचित्त वर्तीत आहात म्हणून स्वामी तुम्हांवर कृपाळू होऊन नूतनवतन
सरदेशमुखींचे बारा महालांचे करून दिले आहे" नागोजी मानेंचे पिताश्री रतनोजी माने हे पराक्रमी व राजकारणी होते.



११ एप्रिल इ.स.१७०३
सिंहगडचा रणसंग्राम
मराठ्यांकडून बाळाजी विषवनाथ व मोगलांकडून तोफखाण्याचा प्रमुख तरबीयतखंन व त्याचा भाऊ कमियाबखान ह्यांच्या नेतृत्वात सिंहगड हस्तांतरणाची चर्चा झाली. १३ एप्रिल रोजी मोगलांनी ५० हजार रुपये च्या बदल्यात सिंहगड किल्ला ताब्यात घेतला.



११ एप्रिल इ.स.१७३८
वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती. वसईच्या किल्ल्याचे नाक म्हणून ओळखला जाणारा धारावी किल्ला हा भाइंदर जवळ आहे. इ.स.१७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्या समोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यामुळे धारावी किल्ल्या चे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते. या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते. तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते.



११ एप्रिल इ.स.१८२७
अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करू या !

ज्योतीबांनी केलेले कार्य विधायक होते.प्रत्यक्ष कार्य करूनच त्यांनी समाजातील उपेक्षितांना पुढे नेण्यासाठी परिश्रम घेतल्यामुळे . समाजाने त्यांचा महात्मा म्हणून गौरव केला आहे.