Get Mystery Box with random crypto!

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ७ एप्रिल इ.स.१६५७ :- ( व | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

७ एप्रिल इ.स.१६५७ :-
( वैशाख शुद्ध चतुर्थी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, मंगळवार )

शिवरायांचा काशीबाई आईसाहेबांशी विवाह :-
शिवरायांनी मातब्बर घराण्यांशी तत्कालीन रुढीनुसार सोयरीक संबंध करून त्यांचीही स्वराज्याशी बांधिलकी तयार केली.
आजच्या दिवशी जाधवरावांच्या घराण्यातील काशीबाई आईसाहेबांचा शिवरायांशी विवाह झाला आणि आणखी एक घराणे स्वराज्याशी जोडले गेले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




६ व ७ एप्रिल इ.स.१६६३
जसवंतसिंहाने कोंढाण्यास वेढा घातला.
शाहिस्तेखानावर पडलेला आकस्मिक छापा औरंगजेबालाही वाटला नसेल इतका दु:खदायक काही राजपूत सरदारांना वाटला. लाल महालातील हा फजितीदायक छापा घडल्यानंतर (इ. १६६३ एप्रिल ६ ) या जसवंतसिंहाने पुण्या शेजारच्या कोंढाणा किल्ल्यावर हल्ला चढविला. त्याच्याबरोबर त्याचा मेहुणा भावसिंह हाडा (बुंदीमहाराजा) हाही होता. जसवन्तसिंहांना सिंहगड अजिबात मिळाला नाही, त्यांनी गडाला वेढा घातला.



७ एप्रिल इ.स.१६८७
(वैशाख शुद्ध ५, पंचमी, शके १६०९, प्रभव संवत्सर, वार गुरुवार)

स्वराज्याचे पेशवे नीळकंठ मोरेश्वर यांची राजाज्ञा!
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्याचे पेशवे नीळकंठ मोरेश्वर यांनी पुरंदरचे किल्लेदार बाजी घोलप यांना राजाज्ञा केली की किल्ले पुरंदरावरील पुरंदरेश्वर व केदारेश्वर यांचा अभिषेक अनुक्रमे नारायण भट व शिव भट करतील या कामी इतर कोणाची ढवळाढवळ न करणे. या कामी स्वामिंची सनद लवकरच पाठविली जाईल या आशयाची आज्ञा केली.



७ एप्रिल इ.स.१७३७
वसईच्या मोहिमे वेळी ७ एप्रिल १७३७ साली मराठ्यांचे सरदार शंकराजी केशव फडके हे चिमाजी अप्पांना लिहितात, "शहरात सिरते समयी आम्ही लोकास ताकीद केली की, रयेतीचे काडीस येकंदर हाथ न लावणे."
अशी असंख्य उदाहरण आपल्याला भेटतील की, कोणत्याही प्रकारे रयतेस तोशीस पोहचू नये, याची काळजी मराठ्यांचे राज्यकर्ते कसे घेत होते. हाच शिवछत्रपतींनी शिकवलेला 'महाराष्ट्रधर्म' होता !



७ एप्रिल इ.स.१८१७
त्रिंबकजी डेंगळेला इकडे पकडायला सैन्य पाठवावे तर भलतीकडेच त्रिंबकजीचे सैन्य छापा मारून जायचे. ह्यावर काय उपाय करावा हे इंग्रजांना अजिबात सुचत नव्हते. पण ते त्रिंबकजींना पकडायचे पूर्णपणे प्रयत्न करत आहेत असे रिपोर्ट्स मात्र ते वेळोवेळी कंपनीच्या डायरेक्टरांना कळवायचे. उदाहरणार्थ हा रिपोर्ट म्हणतो की त्रिंबकजी धारवाडकडे पळून गेलाय पण तरीही त्याच्या फौजा विजापूर - पंढरपूर भागात आहेत - त्याचबरोबर खान्देशात पण त्याच्या फौजा वाढतच चालल्या आहेत!





७ एप्रिल इ.स.१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ७ एप्रिलला देवगड विनासायास इंग्रजांच्या ताब्यात गेला. प्राचीन कालखंडापासून देवगड हे महत्वाचे बंदर म्हणून ओळखले जाते. किल्ल्याच्या बांधकामाच्या कालखंडाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. छत्रपती शिवरायांनी गडाजवळच्या खाडीमध्ये तारवे बांधल्याचा पुरावा उपलब्ध आहे. किल्ल्यावरील तटबंदी आणि बुरुज आजही मजबूत अवस्थेत उभे आहेत. तटबंदीवरून आजूबाजूच्या समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्यावर पुरातन वाड्यांचे अवशेष आणि सुस्थितीत असलेला दरवाजा तसेच पुरातन गणपती मंदिर आहे.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.