Get Mystery Box with random crypto!

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ६ एप्रिल इ.स.१६६३ ( चैत् | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

६ एप्रिल इ.स.१६६३
( चैत्र शुद्ध नवमी, शके १५८५, संवत्सर शोभन, सोमवार )

हल्ल्यानंतर महाराज सिंहगडावर दाखल :-
शाहिस्तेखानाची ३ बोटे छाटली व त्याच्या छावणीत पुर्ण हलकल्लोळ माजवून महाराज सहीसलामत किल्ले सिंहगडी दाखल राजे सिंहगडी सुरक्षित पोहोचले होते. तेव्हा पहाट होत होती. सुर्यनारायणाची आभा पसरत होती. आणि महाराजांच्या हेरांनी सकाळी गडावर बातमी आणली, "खान मेला नाही त्याची फक्त ३ बोटे उडाली". महाराजांना ही बातमी कळली. महाराजांनी स्मितहास्य केले व म्हणाले, "शाहिस्तेखानास शास्त झाली, पातशहाने नाव ठेवले, परंतु यथार्थ ठेवले नाही ते नाव आपण शास्त करून रुजू केले, परमेश्वराने हे अचाट साहस आपणास करावयास लावले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link



६ एप्रिल इ.स.१६६५
इ.स. १६६५ एप्रिल ६ पोर्तूगीज व्हाईसरायचे पत्र - "शिवाजीराजे कानडा प्रांतांतून गोव्याकडे येणारा तांदूळ ताब्यांत घेण्यासाठीं तुमचीं ९ जहाजे मुरगांव बंदराकडे आली व परत जाऊ लागलीं. त्यामुळे आम्हास कांही लढाऊ जहाजे तेथे पाठविणे भाग पडले. त्यांनी तुमची जहाजें धरुन आणूंन बंदरांत ठेवली. परंतु तुमच्या स्नेहसबंधाकडे लक्ष देऊन मीं तीं जहाजें जाळण्याचा हूकूम न सोडतां परत जाण्यास मोकळीक दिली."



६ एप्रिल १६६६ :-
( चैत्र शुद्ध द्वादशी, शके १५८८, संवत्सर पराभव, शुक्रवार )

राजे दिल्ली जवळ करीत होते :-
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगाबाद सोडले व महाराजांच्या पुढच्या प्रस्थानाची बातमी देण्यासाठी वकील म्हणून रघुनाथपंत कोरडे दिल्लीस रवाना झाले. महाराज आग्रा प्रवासात असताना त्यांना औरंगजेबाचे पत्र मिळाले. त्यात औरंग्याने, "मिर्झाराजे जयसिंग यांनी ठरवल्याप्रमाणे तुम्ही इकडील प्रांती रवाना झाले ते पाहून संतोष झाला. ऐशीयास इकडील पुर्ण लोभ तुम्हांवर आहे. म्हणोन अदकार न करता खातरजमेने दरमजल करत निघोन यावे. भेटी अंती बहुत सत्कार पाहून माघारे जाण्याविषयी निरोप दिला जाईल. सांप्रत तुम्हाकरीता पोशाख पाठवत आहे. तो घ्यावा". "भेटी अंती बहुत सत्कार पाहून माघारे जाण्याविषयी निरोप दिला जाईल". हे औरंगजेबाचे लेखी वचन पाहून महाराजांचा उत्साह व अपेक्षा निश्चितच उंचावल्या.



६ एप्रिल इ.स.१६८२
(चैत्र शुद्ध नवमी, शके १६०४, संवत्सर दुदुंभी, वार गुरुवार)

खडगगडाचे किल्लेदार बादशहाच्या सेवेत रुजू!
खडगगडाचे किल्लेदार (अंकाई) आणि खडगगडाच्या प्रदेशातील नामांकित जमीनदार, सावकार, चिमणजी प्रभू बादशाही सेवेत रूजू झाले. महाराजांच्या महानिर्वाणानंतर फितुरांची स्पर्धाच लागली होती. वतनासाठी लाचार होऊन मुसलमानी सत्ताकर्ते फेकतील ती हाडके घेऊन चघळण्यात धन्यता मानणार्‍यांची अहमिका लागली होती! बादशहातर्फे चिमणाजी प्रभू यांना मोठी खिलजीची वस्त्रे देऊन गौरविण्यात आले.





६ एप्रिल इ.स.१७८२
अहमदखानाचे व नजफखानाचे वाकडे होते. त्यामुळे बादशहा शहाअलम हा आपला वजीर नजफखान याच्या वर्चस्वास कंटाळला. शहाअलम बादशहा हा मराठ्यांच्या मर्जीने रहाण्यास उत्सुक होता आणि वारंवार तो बोलून दाखवी की, महादजी शिंदे किंवा हरिपंत फडके यासारखा एक फौजबंद मराठा सरदार सतत दिल्लीस रहावा आणि मराठ्यांनी बादशहास दरमहा २ लक्ष रुपये देऊन करोडीची स्थळे हस्तगत करावी. ही परिस्थिती सन १७८० मध्ये होती. परंतु यावेळी मराठे व इंग्रज यामध्ये नेकीने युद्ध चालू असल्यामुळे मराठ्यास हे कार्य पत्करणे शक्य नव्हते. दिनांक ६ एप्रिल १७८२ रोजी नजफखान मृत्यू पावला. आणि पुढील महिन्यात सालबाईचा तह पुरा होऊन पहिले इंग्रज मराठे युद्ध थांबले. तेव्हा महादजी शिंदे यांना दिल्लीच्या राजकारणाकडे लक्ष पुरवण्यास अवसर मिळाला. बादशहास सन १७७२ त दिल्लीस आणून तख्तनशीन केल्यावेळे पासून महादजी शिंद्यांच्या मनात दिल्लीचा कारभार आपल्या ताब्यात घ्यावा असे होते पण वर सांगितल्याप्रमाणे सालबाई तहापर्यंत महादजींना दिल्लीच्या राजकारणाकड पहाण्यास फुरसत नव्हती. ह्या संधीचा फायदा मिझ नजफखान याने घेतला. पण मिझ नजफ ६ एप्रिल १७८२ मध्ये निर्वतल्यानंतर दिल्लीच्या बादशहाने महादजीस दिल्लीचा कारभार हाती घेण्याची विनंती केली. बादशहा शहाअलम महादजींना दिल्लीस आणण्यास एवढा उतावीळ झाला की, त्याने त्यावेळी दिल्ली दरबारी असलेले मराठ्यांचे वकील हिंगणे यास महादजीस दिल्लीस येण्यास आवर्जून लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे हिंगणे यांनी पाटील बावांस लिहिले, “ही वेळ अशी आहे की, इकडे येण्याने तुम्हाला कीर्तीच नव्हे तर पैसाही मिळेल.”