Get Mystery Box with random crypto!

अंधारात महाराजांनी अंदाजाने खानावर खाडकन् घाव घातला. हा घाव खा | " छञपती श्री शिवाजी महाराज "

अंधारात महाराजांनी अंदाजाने खानावर खाडकन् घाव घातला. हा घाव खानाच्या उजव्या हातावर बसला अन् तीन बोटे तुटली. खान प्राणांतीक आरडला.महाराजांना वाटले, खान खलास झाला. ते परत फिरले.या युद्धात महाराजांची सहा माणसे ठार झाली व चाळीस जखमी झाली. जखमी झालेल्यांमध्ये कोयाजी बांदल हे सुद्धा होते. रात्रीच्या या हल्ल्यात खानाचा एक मुलगा, एक जावई, बारा बिव्या, चाळीस मोठे दरकदार, एक सेनापती असे एकूण पंचावन्न लोक महाराजांनी व त्यांच्या मराठ्यांनी मिळून कापून काढले होते. सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता.दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले...



५ एप्रिल इ.स.१६८९
(चैत्र वद्य द्वितीया, शके १६०३, संवत्सर सिद्धार्थी, वार सोमवार)
छत्रपती राजाराम महाराजांनी किल्ले रायगड सोडला.
दुर्गराज रायगड म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या तक्ताची जागा. गडांचा राजा व राजांचा गड, परंतु नियतीची चक्रे अकस्मात फिरली व इ.स.१६८९ पर्यंत अभेद्य व अप्राप्य वाटणारा हा हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचा गड छत्रपती संभाजी महाराजांच्या म्रृत्यूनंतर मात्र हतबळ झाला. शत्रूसुद्धा जो सहजी कधी प्राप्त होईल असे वाटले नव्हते तो गड २५ मार्च इ.स.१६८९ पासून मोगली विळख्यात सापडला. रायगडचे फास आवळले जाऊ लागले. समय बाका होता, महाराणी येसुबाईसाहेब यांनी आपल्या पुत्रास मंचकारोहण करण्याचा मोह टाळून आपल्या दिरास वारसदार म्हणून मंचकारोहण करण्याच्या निःस्वार्थी व उदार निर्णयाने स्वराज्याचा वारसा हक्काचा धोका मागे पडून मोगली आक्रमणास का, कसे, कुठे व कोणी व कोणती उपाय योजना करावी यावर विचारमंथन झाले. प्राप्त परिस्थितीत रायगडावर शाहू महाराजांसह आपण वास्तव्य करण्याचा व युवराज राजाराम महाराजांनी बाहेर पडून मोगलांशी संघर्ष सुरू ठेवण्याचा सल्ला सर्व जेष्ठ की श्रेष्ठ मुत्सद्यांना व सेनांनींना पटला. त्यानुसार युवराज राजाराम महाराजांनी ताराराणीसाहेब, राजसबाईसाहेब, प्रल्हाद निराजी आदींसह गुप्तपणे रायगडाच्या वाघ दरवाज्यातून जिंजीकरीता प्रयाण केले.





५ एप्रिल इ.स.१७१८
मराठा सरखेल 'कान्होजी आंग्रे' यांच्या आरमाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व तह बाजूला सारून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे कौन्सिलच्या बैठकीत आंग्र्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला.
पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी आंग्र्यांचे एक शिबाड पकडले तेंव्हा आंग्र्यांनी इंग्रजांना पत्र पाठवले. "तुमची आमची मैत्री संपली. इथून पुढे देवाची कृपा होऊन माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही."



५ एप्रिल इ.स.१७४०
श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी दि. २३ मार्च १७४० रोजी खरगोण प्रांतात प्रवेश केला. सुभ्याची व्यवस्था लावत असताना बाजीरावांची तब्येत बिघडली होती. दि. ५ एप्रिल रोजी बाजीराव नर्मदाकाठी रावेरखेडी येथे आपल्या वाड्यात येऊन राहिले. इतर प्रांतांची व्यवस्था लावून पूर्ण झालेली होती. परंतु, तरीही बाजीराव पेशवे पुण्याला न राहता रावेरखेडीलाच राहिले. वास्तविक पुणे हे बाजीरावांचे अत्यंत प्रिय. शनिवारवाड्यासारखा बळकट महाल त्यांनी उभा केला, पुण्याची पुनर्बाधणी केली. परंतु, मस्तानी प्रकरणाने त्याच पुण्याने आपल्या घरातल्यांनीही त्यांना वाळीत टाकल्यासारखेच केले होते. सतत मस्तानीच्या असण्यावरून घरातल्या मंडळींचे नाराज चेहरे त्यांना पुण्यापासून लांब राहण्यास प्रवृत्त करू लागले. चिमाजीआप्पांनी राधाबाईंना पत्राद्वारे रावांची प्रकृती कळवली.



५ एप्रिल इ.स.१७७०
मराठ्यांनी आग्रा व मथुरा जिंकले
तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांची जबरदस्त हानी झाली होती. त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे नानासाहेब पेशवा लवकरच निधन पावला. त्यामुळे उत्तरेत लक्ष देता आले नाही.
१७६८ नंतर माधवरवाना उत्तरेकडे लक्ष देण्यास फुरसत मिळाली. १७६९ च्या शेवटी माधवरावांनी एक जंगी मराठा सैन्य रामचंद्र गणेश कानडे आणि विसाजी कृष्ण बिनीवाले यांच्या नेतृत्वाखाली उत्तरेकडे रवाना केले.पानिपत युद्धातील कलंक धुवून काढणे,विश्वासघातकी नजीबला शासन करणे व उत्तरेत पुन्हा मराठ्यांचे अधिपत्य निर्माण करायचे,असे माधवराव नि ठरवले होते.त्याचा भाग म्हणून मराठ्यांनी पुन्हा उत्तरेत आपला जम बसविण्यास सुरुवात केली.महादजी शिंदे सुद्धा मोठ्या जोमाने ह्या कार्यात आघाडीवर होते.
मराठी फौजांच्या मार्गात जाट मंडळींचा अडथळा होता.पण ५ एप्रिल १७७० ह्या दिवशी मराठ्यांनी जाट सैन्याचा पराभव करून आग्रा व मथुरा हि दोन ठिकाणे काबीज करून दिल्लीकडे आगेकूच चालू ठेवली.