Get Mystery Box with random crypto!

या कलमाने इंग्रजांचे झालेले नुकसान भरून दिले पाहिजे, हि गोष्ट | " छञपती श्री शिवाजी महाराज "

या कलमाने इंग्रजांचे झालेले नुकसान भरून दिले पाहिजे, हि गोष्ट तत्वतः व प्रत्यक्षतः शिवरायांनी स्पष्टपणे मान्य केली.
नारायण शेणव्याचा हा मोठा विजय होता. त्याने ४ एप्रिल रोजी मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कळवले, ' येत्या जूनमध्ये राज्याभिषेक करून घेण्याच्या उद्देशाने शिवाजी तयारी करीत आहे. सोनें, हिरे यांनी जडवलेले भव्य सिंहासन तयार होत आहे. असंख्य विद्वानांना बोलावणी जातील. रायगडावर फार मोठ्या प्रमाणात दानधर्म होईल. आता ऑक्झेंडनबरोबर शिवाजीकरिता चांगला नजराणा पाठवा. आरबी घोडा वगैरे न धाडता मूल्यवान रत्ने, राज्याभिषेकसमयी धारण करण्याजोगी पाठवावीत. नजराणा हजार बाराशे रुपयांचा पाठवावा.'



४ एप्रिल इ.स.१६८३
(चैत्र वद्य तृतीया, शके १६०५, संवत्सर रुधिरोद्रारी, वार बुधवार)

छत्रपती संभाजी महाराजांचा तारापूर, डहाणू व अशेरी भागावर हल्ला!
एकीकडे पोर्तुगीज छत्रपती संभाजी महाराजांशी तह करून वरवर आपले सलोख्याचे संबंध आहेत असे दाखवत होते आणि त्याच सुमारास औरंगजेबाचा एक दुत गोव्याच्या विजरईशी वाटाघाटी करण्यासाठी आला होता. अशा स्वरूपाच्या छुप्या गोष्टी कोंट-द-अल्वारे पत्ररूपाने करत असल्याचे छत्रपती संभाजी महाराजांना समजले आणि मग या विश्वासघातकी पोर्तुगिजांना चांगलाच धडा शिकविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी ठाणे जिल्ह्यातील डहाणू, सिरीगाव (शिरगाव), असेरी (अशेरी), सैबाण (बहुधा सायवन), तारापूर या पोर्तुगीज ठाण्यावर प्रचंड हल्ला करून अनेक खेडी जाळली. छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे बदला म्हणून कोंट-द-अल्वारेने छत्रपती संभाजी महाराजांचे गोव्यातील वकील येसाजी गंभीरराव यांना अटक करून नजरकैदेत ठेवले.



४ एप्रिल इ.स.१६८७
छत्रपती संभाजी महाराज मोगलांवर बाहेरून हल्ले चढविण्याकरिता व सर्वत्र रसद मारून मोगली सैन्य जेर
करण्यासाठी आपल्या सैनिकासह गोवळकोंड्याभोवती हिंडत होते. त्यांचे कर्नाटकातील सैन्यही नाकेबंदी करून राहिले होते. मच्छलीपटणचे दिनांक ४ एप्रिल १६८७ चे फोर्ट सेंट जॉर्जला लिहिलेल्या पत्रात छत्रपती संभाजीराजे १२ हजार स्वार व ५० हजार पायदळ लोकांसह गोवळकोंडा याच्या रोखाने गोवळकोंड्यापासून ४/५ दिवसांच्या मुक्कामावर आले आहेत असा मजकूर आहे. गोवळकोंड्याचा सुलतान मोगलांच्या हल्ल्याचा जोरात प्रतिकार करीत होता.



४ एप्रिल इ.स.१७०३
सिंहगडचा रणसंग्राम
४ एप्रिल१७०३ ला तर सेनापती धनाजी जाधवांचा पुत्र शम्भूसिंह जाधवने म्हलर्जी व खंडोजी च्या सोबतीने ४ हजार घोडदळ सकट इराडत खानाच्या ठाण्यावर हल्ला केला. हे ठाणे बादशाही छावणीच्या रक्षणाच्या हेतूने छावणी पासून केवळ ४ कोस दूर होते.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.