Get Mystery Box with random crypto!

३१ मार्च इ.स.१७४३ सन १७४३ च्या फेब्रुवारी महिन्याचे प्रारंभी प | " छञपती श्री शिवाजी महाराज "

३१ मार्च इ.स.१७४३
सन १७४३ च्या फेब्रुवारी महिन्याचे प्रारंभी पेशवे पन्नास हजार फौजेनिशी बिहार प्रांतात दाखल झाले. पुढे पेशवे कूच करून मुर्शिदाबादेस निघाले. रघूजीनी बरद्वान परगणा ताब्यात घेऊन कटवा येथे सैन्याची छावणी केली. पेशव्यांनी तारीख ३१ मार्च १७४३ रोजी तुकोजी पवार, शिंदे, होळकर, जाधव इत्यादि सरदारांसह अलिवर्दीखानाची भेट घेतली. पेशवे व नबाब यांच्या भेटीत असे ठरले की, नबाबाने शाहू महाराजांस चौथाई द्यावी आणि पेशव्यास सैन्याचे खर्चाबद्दल बावीस लाख रुपये द्यावेत. रघूजी भोसल्यांनी बंगाल प्रांतावर स्वारी करू नये. याविषयी पेशव्यांनी रघूजी भोसल्यांशी करार करून बंदोबस्त करावा. पुढे नबाब व पेशवे आपल्या सर्व सैन्यानिशी रघूजी भोसल्यांवर चाल करून गेले. मराठे घोडदळापुढे नबाबाचे घोडेस्वारांचा टिकाव लागला नाही.



३१ मार्च इ.स.१७४४
भास्कर राम आपल्या २१ सेनानींसोबत "मानकरा" मैदानात आले. भास्कररामाने बंगाल वर इ.स.१७४४ मध्ये तिसरी स्वारी केली. अलीवर्दीखान त्यामुळे हताश झाला. पेशव्यांना दिलेले पैसे वाया गेले होते. यावेळी मात्र त्याने एक नवा डाव खेळण्याचे ठरविले. त्याचा प्रमुख अफगाण सेनापती गुलाम मुस्तफाखान यांच्याशी सल्लामसलत करून नबाबाने मराठी विरांविरुद्ध एक कट रचला, मराठ्यांना मित्रत्वाच्या नात्याने बोलावून त्यांची कत्तल करण्याची ही योजना गुप्तपणे तयार झाली. चर्चमध्ये जी रक्कम ठरेल ती देण्यास नबाब उत्सुक असून मराठे येऊन नबाबास भेटतील तर लागलीच रक्कम अदा केली जाईल असे आश्वासन नबाबाच्या लोकांनी मराठ्यांना दिले. विश्वासघात होणार नाही याचे आश्वासन मिळाल्याने भास्कर रामाने नबाबाकडे येण्याचे कबूल केले. भेटीचा मुहूर्तही ठरला. भेटीसाठी "मानकरा" मैदान ठरविण्यात आले. भास्कर राम आपल्या २१ सेनांनींसोबत "मानकरा" मैदानात आले. जानकीराम आणि मुस्तफाखान यांनी त्यांचे स्वागत केले. मराठ्यांना खास सजविलेल्या तंबूत रुजामे पसरले होते. मराठ्यांची सरबराई चालू असतानाच इशारा झाल्यावर तंबूच्या भोवती जमलेल्या नबाबाच्या सैनिकांनी मराठ्यांवर हल्ला चढवून २२ मराठी विरांना दगलबाजीने ठार केले. मराठी सैन्याने माघार घेतली. नबाबाने सैन्यात १० लाखांची खैरात केली. सर्व अधिकाऱ्यांना बढत्या दिल्या. बंगालमध्ये मात्र आजही भास्कर रामाचा धाक आहे. लहान मुल रडायला लागले तर आया त्यांना दम देतात की, रडायचे थांबा नाही तर भास्कर पंडीत येऊन तुला घेऊन जाईल.



३१ मार्च इ.स.१८५८
तात्या टोपे लक्ष्मीबाई राणीच्या मदतीला
ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.





YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.