Get Mystery Box with random crypto!

आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ३० मार्च इ.स.१६६३ (चै | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

३० मार्च इ.स.१६६३
(चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १५८५ संवत्सर शोभन वार सोमवार)

सरसेनापती नेतोजी पालकर जखमी!
मोगली मुलखात लुटालूट करण्यासाठी सरसेनापती नेतोजी पालकर गेले होते. परंतु दैव प्रतिकूल होते. त्यामुळे मोगली मुलखातच मुघल फौजेने त्यांना गाठले व चकमक झाली. सरसेनापती नेतोजी पालकर यांनी पराक्रमाची शर्थ केली. परंतु बळ कमी पडल्यामुळे मराठी सैन्याला माघार घ्यावी लागली व त्यातच सरसेनापती नेताजी पालकर यांच्या हाताला व पायाला जखमा होऊन ते जायबंदी झाले. मात्र मराठा फौजेचा पाठलाग करीत मुघल सैन्य विजापुर मुलखात दाखल झाले. यावेळी रस्तम ए जमान याने मुघलांची भेट घेऊन त्यांचे मन वळविले. अपरिचित मुलूख असुन अनवट वाटा व जंगल असल्यामुळे सरसेनापती नेताजी पालकर यांचा पाठलाग करु नये. असे सांगून मुघल सैन्य माघारी पाठविले. रुस्तम-ए-जमान व महाराजांचा अंतस्थ स्नेह अशा रीतीने उपयोगास आला.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




३० मार्च इ.स.१६६५
मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखान यांनी ठरविल्याप्रमाणे ते पुरंदर किल्ल्यास वेढा घालण्यासाठी पुण्याहून दिनांक १५ मार्च १६६५ रोजी निघाले. बरोबर अफाट फौज, तोफखाना व सामान, सरंजाम होता. ते राजेवाडीच्या जवळपास दिनांक ३० मार्चला पोचले. तेथून जयसिंगाने दिलेरखानास सासवडला रवाना केले. सासवड मुक्कामी त्याजवर मराठी फौजेचा अचानक छापा पडला. गडबड उडाली पण खान आपली फौज घेऊन दौडत सुटला पुरंदरा कडे निघाला.



३० मार्च इ.स.१६८४
(चैत्र वद्य दशमी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार रविवार)

औरंगजेबाचे विजापुरकरांना फर्मान!
औरंगजेबाने विजापुरकरांना एक फर्मान धाडले. त्यात विजापुरकरांना खडसावून सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांची तुमची मित्रता व सख्य करण्याचे सोडून आपण सर्वांनी एकदील होऊन छत्रपती संभाजी महाराजांचा फडशा पाडला पाहीजे. या आशयाचे हे फर्मान म्हणजे विजापुरकरांना एक प्रकारे तंबी होती.



३० मार्च इ.स.१७२९
थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतापुर इथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
नर्मदेच्या उत्तरेकडच्या प्रदेशाला हिंदुस्थान म्हणत.
त्या सुमारास रोहिलखंडाच्या महमद बंगश याने बुंदेलखंडावर आक्रमण केले.
बुंदेल राजे महाराज छत्रसाल आक्रमणाने त्रस्त झाले.
त्यांनी राऊंना आपल्या भाषेत दोन चरणांत आपली स्थिती लिहून कळवली, त्याचा मथितार्थ

जो गती गजेंद्र की, सोही गत पावत आज
बाजी जात बुंदेल की, राखो बाजी लाज ।।

सुसरीच्या तोंडात पाय अडकलेल्या लक्ष्मीच्या गजेंद्र-हत्तीची जी गत, त्या अवस्थेत मी आहे.
अशा प्रकारचा छत्रसाल यांचा याचनास्पद निरोप येताच, राऊंनी महाराज छत्रसाल बुंदेल्यांना त्यांच्यावर झालेल्या आक्रमणासमयी प्रत्यक्ष जाऊन मदत केली आणि बंगशला पळवून लावले.



३० मार्च इ.स.१७४०
फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक बाजीरावांची प्रकृती बिघडली.





३० मार्च इ.स.१७४१
सातारा व कोल्हापूरकर छत्रपति या एका झाडाच्या दोन फांद्या. ह्या दोन गाद्या एक कराव्या असा विचार बाळाजी बाजीरावांचा होता. त्यास चिमाजीअप्पांची संमति होती. कोल्हापूरकर संभाजी राजे शाहू महाराजांच्या भेटीस साताऱ्यास आले आणि तारीख २ जून १७४० ते ३० मार्च १७४१ पर्यंत साताऱ्यास राहिले. ह्या मुदतीत बाळाजी बाजीरावांनी कोल्हापूरच्या संभाजी राजांशी वाटाघाटी करून शाहू महाराजांच्या पश्चात राज्यव्यवस्था कशी करावी ह्या बद्दल एक गुप्त करार संभाजी राजांशी केला. हा करार शाहू महाराजांच्या कारकीर्दीत बाहेर न फुटण्याची खबरदारी दोन्ही पक्षांनी घेतली. करार नानासाहेब व चिमाजी अप्पा ह्या उभयतांनी संभाजी राजे यास लिहून दिला. त्यातील मुख्य बाब अशी “सातारचे राज्य स्वामींचे आणि एकछत्री शिक्का महाराजांचा (संभाजी राजांचा) चालावा. शाहू महाराजांचा जीवात्मा आहे तो बाह्यात्कारी आम्ही त्यांचे सेवक परंतु अंतर्यामी स्वामींचे, शाहू महाराज ह्यांनी कैलासवास केल्यावर दोन्ही राज्ये स्वामींची व आम्ही सेवक स्वामींचे, स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वर्तणूक करू”. शाहू महाराज निवर्तल्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली की हा करार मागे पडला आणि दोन्ही राज्यांचा समेट घडवून आणण्याचे काम तसेच राहून दोघांच्या भांडणामुळे राष्ट्राची हानी व्हावयाचे टळले नाही.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर