Get Mystery Box with random crypto!

आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष २४, २५, २६ मार्च १६६२ :- | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

२४, २५, २६ मार्च १६६२ :-
( चैत्र पौर्णिमा, वद्य प्रतिपदा, द्वितीया, शके १५८४, संवत्सर शुभकृत, सोमवार, मंगळवार, बुधवार )

मराठा मोगल संघर्ष :-
मराठा मोगल संघर्षाचा विक्रम. जागोजागी शाहिस्त्याला शह देण्यासाठी मराठ्यांच्या चकमकी सुरू होत्या. मराठी मनगट काय असते याची प्रचिती शाहिस्त्याला आली होती.
याच सुमारास पेणवर छापा घालून नामदार खानाला झटका दिला. या जबरदस्त लढाईत वाघोजी काका तुपे जखमी तर कृष्णाजी काका बाबाजी धारतीर्थ पडले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




२५ मार्च इ.स.१६८३
(चैत्र शुद्ध सप्तमी, शके १६०५, संवत्सर रुधिरोद्रारी, वार रविवार)

मोगल मराठा चकमकी!
हा काळ दोहोंसाठी म्हणजे मोगल व मराठ्यांसाठी संघर्षाचा होता. जागोजागी मराठा व मोगल संघर्षाच्या चकमकी उडत होत्या. एका मराठी सैन्य पथकाने पेडगावच्या बहादुरगडावर हल्ला केला. मात्र शहजादा आज्जमने मामुरखानास बहादुरगडावर जायची आज्ञा केली तसा तो वेगाने बहादुरगडाकडे आला. मराठ्यांनी देखील मग अतिरिक्त हानी टाळण्यासाठी किल्ल्यापासून ३५ मैल दौड केली. मात्र शेवटी संघर्ष झालाच व त्यात दोन्हीकडचे योद्धे कामी आले.



२५ मार्च इ.स.१६८७
(चैत्र वद्य सप्तमी, शके १६०९, संवत्सर प्रभव, वार शुक्रवार)

छत्रपती संभाजी महाराजांची कुतुबशाहास मदत!
छत्रपती संभाजी महाराजांचे राज्य बुडविता येत नाही तेव्हा नामुष्की टाळण्यासाठी किमान अदिलशाही आणि कुतुबशाही संपवावी या हेतूने सप्टेंबर इ.स.१६८६ मध्ये अदिलशाहीचा अंत झाल्यावर आता औरंगजेबाची वक्रदृष्टी कुतुबशाहीकडे वळली. छत्रपती संभाजी महाराजांनी आपले १२ हजार घोडदळ, व ५० हजार पायदळ, कुतुबशहाच्या मदतीस पाठविले. येथे एक गोष्ट निश्चित सांगण्यासारखी आहे की, मराठी सैन्य जे कुतुबशाही वाचविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी पाठविले होते. त्या सैन्याने गनिमी काव्याने महाराष्ट्रात मोगलांना धुळ चारली होती. हाच कित्ता आता भागानगरात गिरवत होते. मराठी सैन्य मोगलांची रसद तोडण्याचे काम करीत असत अन् लचके तोडून निघून जात त्यामुळे मोगली सैन्य बेजार होऊ लागले. इतके की, कुतुबशाही व मराठ्यांच्या सैन्यापुढे मोगल सैन्य असमर्थ ठरू लागले.



२५ मार्च इ.स.१६८९
(चैत्र शुद्ध पौर्णिमा, शके १६११, संवत्सर शुक्ल, वार सोमवार)

हिंदवी स्वराज्याची राजधानी मोगली विळख्यात!
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड काबीज करण्याची मोहीम औरंगजेबाने झुल्फिकारखानाची नेमणूक केली होती. मराठ्यांच्या राजधानीस वेढा घालण्यात आला. रायगडावर या समई मराठ्यांचे संपूर्ण राजकुटूंब निवास करत होते. महाराणी येसुबाईसाहेब, शिवराज्ञी सकवारबाईसाहेब, शाहुराजे, राजारामराजे, त्यांच्या पत्नी ताराराणीसाहेब, व राजसबाईसाहेब हे खासा कुटुंब, सोबत मराठ्यांचे थोर सेनानी संताजीराव घोरपडे, धनाजीराव जाधव, प्रल्हाद निराजी, आदी शिवकाळातील मंडळी सुद्धा रायगडावर होती. मात्र रायगडाला वेढा पडला होता.



२५ मार्च इ.स.१७०३
सिंहगड किल्लेदाराच्या मृत्यू नंतर मोगलांचे मोर्चे २१ मार्च रोजी कल्याण दरवाजात पर्यंत सरकले होते.
त्यास उत्तर म्हणून किल्ल्यातील दीड हजार मराठयांनी २५ मार्च रोजी उजबेकखांनाच्या ठाण्यावर सडकून हल्ला केला. व तेथे कापाकापी करून परत किल्ल्यात गेले.





२५ मार्च इ.स.१७५७
प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.