Get Mystery Box with random crypto!

आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष २४, २५, २६, मार्च इ.स | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

२४, २५, २६, मार्च इ.स.१६६२
(चैत्र पौर्णिमा, वद्य प्रतिपदा, द्वितीया, शके १५८४, संवत्सर शुभकृत, वार सोमवार)

मोगल मराठा संघर्ष!
२६ मार्च इ.स.१६६२ मोगल मराठा संघर्षाचा विक्रम जागोजागी शाहिस्तेखानाला शह देण्यासाठी मराठ्यांचा एल्गार सुरू होता. मराठी मनगट काय असते याची शाहिस्तेखानाला मजबूत प्रचिती आली होती. याच सुमारास पेणवर छापा घालून नामदार खानाला करारा झटका याच जबरदस्त लढाईत वाघोजी तुपे जखमी तर कृष्णाजी बाबाजी धारातिर्थी पडले. मात्र मराठी राज्यात सह्याद्रीच्या डोंगररांगात आता आपण जास्त तग धरू शकत नसल्याची मोगली सेनेला जाणिव झाली. मात्र इतके पराभव, लुटपात होऊनसुद्धा औरंगजेबाकडे मात्र खोटीनाटी पत्रे पाठवून १शाइस्तेखान विजयाच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराभवाच्या खोट्या गोष्टी करत लालमहालात ऐशोआरामात लोळत होता.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




२४ मार्च इ.स.१६७४
मुंबई बेट इंग्रजांच्या ताब्यात इ. स. १६६४ डिसेंबरमध्ये आले. त्या वेळेपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांशी सख्य राखण्याचा प्रयत्न करीत होते. तदनंतर जानेवारी, १६६४ च्या सुरत येथील लुटीच्या निमित्ताने त्यांचा शिवाजी महाराजांशी प्रत्यक्ष संबंध आला. मोगलांकडून शिवाजी महाराजांनी आपले सर्व गड किल्ले घेतले हे पाहून इंग्रजांना शिवाजी महाराजांबद्दल दहशत निर्माण झाली. पण इंग्रजांनी शिवाजी महाराजांचा शत्रू जो सिद्दी यास गुपचूप मदत करण्याचे धोरण ठेविले. शिवाजी महाराजांना हे कळताच त्यांनी इंग्रजांना तंबी दिली. याचा परिणाम असा झाला की सिद्दीचे आरमार पावसाळ्यासाठी १० मे १६७३ रोजी मुंबई बंदरात आश्रयासाठी येऊ लागले तेव्हा त्यास इंग्रजांनी येऊ दिले नाही. इंग्रजांना शिवाजी महाराजांशी चांगले संबंध राखावयाचे होते म्हणून त्यांनी आपला वकील थॉमस निकोलसन यास ११ जून १६७३ रोजी शिवाजी महाराजांच्या भेटीस पाठविले. परंतु त्याचीही काही फलनिष्पती झाली नाही. तेव्हा इंग्रजांतर्फे नारायण शेणवी हा इंग्रजांचा दुसरा वकील बोलणी करण्यास २४ मार्च १६७४ रोजी रायगडावर शिवाजी महाराजांकडे गेला. तसेच ऑक्सिंगडेन हाही शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या वेळी इंग्रजातर्फे नजराणा घेऊन गेला. २४ मार्च १६७४ रोजी तो निराजीपंताची भेट घेण्यासाठी पाचाड येथे थांबला. पण निराजी पंत रायगडावर होते; म्हणून त्यांनी आपल्या आगमनाची वर्दी गडावर धाडली. त्यावर निराजींनी गडावरून निरोप धाडला की, छत्रपती शिवाजी महाराज यांची एक भार्या नुकतीच निर्वातल्या असल्यामुळे राजे सुतकांत आहेत. सुतक फिटेपर्यंत गडावर न येता (पाचाडास) माझे घरी रहा. नारायण शेणवीने पाच दिवस पाचाड येथे रिकामटेकडेपणात घालविले. २८ मार्च रोजी पाडव्याच्या निमित्ताने निराजी गडावरून पाचाड येथे आला.



२४ मार्च इ.स.१६७७
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
२४ मार्च १६७७ ते एप्रिल १६७७ या काळात छत्रपती शिवरायांचा आंध्रप्रदेश येथील 'श्री शैल्यम मल्लिकार्जुन' येथे मुक्काम.
शिवाजी महाराजांचीही श्री शैल्यम मल्लिकार्जुनावर आत्यंतिक श्रद्धा होती. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी या देवालयाच्या विशाल गोपुरांचे बांधकाम करून दिले आणि येथील नित्य पूजेसाठी व्यवस्था केली. तसेच मंदिराच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी रक्षक पथकाचीही नियुक्ती केली. भागानगर पासून काही अंतरावर असलेल्या आणि कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या गोपुरास 'श्री शिवाजी गोपूर' असे नाव असून तिथे छत्रपती शिवरायांच्या हातात तलवार घेतलेले दगडातले कोरीव शिल्प उपलब्ध आहे.


२४ मार्च इ.स.१७१९
रफी उदजीत यास बादशाही मिळाल्यानंतर बाळाजी विश्वनाथ पेशव्यास बादशहाकडून तारीख १३ मार्च रोजी दक्षिणेतील सहा सुभ्यांच्या चौथाई वसुलीबाबत तिन्ही फर्माने मिळाली. त्यात तंजावर, त्रिचनापल्ली, म्हैसूर या मांडलिक राज्यांकडूनही चौथाई वसूल करण्याचा हक्क कबूल करण्यात आला. २४ मार्चच्या फर्मानाने सरदेशमुखी हक्क कबूल करण्यात आले आणि तिसऱ्या फर्मानाने शाहू महाराजांकडे शिवाजी महाराजांच्या वेळचे स्वराज्य कायम केले आणि बादशहाच्या कैदेत असलेले शाहू महाराजांचा भाऊ मदनसिंग व आई यांची रवानगी बाळाजी विश्वनाथांबरोबर दक्षिणेत केली. बरोबर फर्माने व शाहू महाराज मंडळीस घेऊन पेशवे बाळाजी विश्वनाथांनी मार्च १७१९ च्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली सोडली. परतीचा प्रवास ह्या मंडळीनी राजपुतान्यातून जयपूरवरून सिरोंज, भेलसा आणि माळवा यातून करीत हंडिया येथे नर्मदा
पार केली.