Get Mystery Box with random crypto!

*_JayBhim Today Morning Updates_* राज्यातील शैक्षणिक संस्थां | ☸️ Bahujan Update ✅

*_JayBhim Today Morning Updates_*

राज्यातील शैक्षणिक संस्थांतील महाविद्यालय, विद्यापीठांत आता अध्यापकांना संवर्गनिहाय आरक्षण लागू होणार; विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने विधेयक मंजूर

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी परिसरात ड्राय डे घोषित; तसेच पुणे महानगर परिवहन मंडळाच्यावतीने ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी २६० बसेसची व्यवस्था

जातीयवादी मंत्री धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांच्या जागी बौद्ध व्यक्तीकडे पदभार द्या - रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची आग्रही मागणी; परळीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे एम.फील ते पीएच.डी. फेलोशिप साठी उपोषण सुरूच

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांसाठी अकरावी व बिगर व्यावसायिक विद्यार्थ्यांची पहिली निवड यादी अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; हि यादी वसतिगृहाच्या नोटीसबोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची विभागाची माहिती

चीनच्या कम्युनिस्ट सरकारने हटवली सुचिआन प्रांतातील ९९ फूट उंच गौतम बुद्धांची मूर्ती; सोबतच ४५ विशाल प्रार्थना चक्रे देखील हटवले; तिबेटियन लोकांच्या प्राचीन परंपरा व संस्कृतीवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी हिमाचल प्रदेशमध्ये कॅन्डल मोर्चा काढण्यात आला

_ _ _ _ _ _ _ _ _ _

*नोटीस*: _जयभिम टुडे हे माध्यम तात्काळ मिडिया नसून जनमानसात कामाची माहिती पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम करते. सोशल मिडियावर विश्वसनीय माहितींचा तुटवडा असल्यामुळे व चुकीच्या माहितींमुळे संभ्रम निर्माण होत असल्याने परिपूर्ण माहितीकरिता तुमच्या मित्रपरिवारास जयभिम टुडे ला जास्तीत जास्त जॉईन करण्यास सांगावे._
_ _ _ _ _ _ _ _ _ _


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहावे - सिंधुदुर्ग पोलिसांची नोटीस; तर नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार; संतोष परब हल्ला प्रकरण भोवले

महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारा तथाकथित संत कालिचरण याच्यावर गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या फिर्यादीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; देशभर संताप

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी नवे नियम जारी; कोरोना चाचणीच्या निगेटिव्ह अहवालासोबत प्रवाशांचे लसीकरण देखील पूर्ण होणे गरजेचे; कॅसिनो, सिनेमा हॉल, ऑडिटोरियम, वॉटर पार्क आणि एंटरटेनमेंट पार्कमध्ये क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच परवानगी

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (सीएपीएफ) जवानांचा समावेश फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांमध्ये करण्यात आल्याने  त्या जवानांनाही १० जानेवारीपासून कोरोना लसींचे बूस्टर डोस मिळणार; तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांनाही बूस्टर डोस देण्याचा निर्णय 

आयकर विभागाने करदात्यांना दिला दिलासा : ज्या करदात्यांनी आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये आयकर विवरणपत्राचे आतापर्यंत ई-व्हेरिफिकेशन केले नाही, असे करदाते ही प्रक्रिया २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पूर्ण करू शकतील