Get Mystery Box with random crypto!

“स्लिनेक्स 18”: भारत-श्रीलंका यांच्या नौदलांचा संयुक्त सागरी अ | Pune Rooms 24×7

“स्लिनेक्स 18”: भारत-श्रीलंका यांच्या नौदलांचा संयुक्त सागरी अभ्यास

भारत आणि श्रीलंका यांच्या नौदलांचा “स्लिनेक्स (SLINEX) 18” नावाच्या संयुक्त सागरी अभ्यासाला 7 सप्टेंबर 2018 पासून सुरुवात झाली.

हा सराव 13 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

श्रीलंकेच्या त्रिनकोमली जवळ स्लिनेक्स (SLINEX) सागरी सराव मालिकेची यावर्षी सहावी आवृत्ती आयोजित केली गेली आहे.

भारतीय नौदलाचे ‘INS कोरा दिव्ह’, ‘INS किर्च’ आणि ‘INS सुमित्रा’ हे जहाज सहभागी झाले आहेत.

2005 साली याची प्रथम आवृत्ती आयोजित केली गेली होती.



ग्रेटर नोएडामध्ये ‘इंडसफूड-II 2019’चे आयोजन

14-15 जानेवारी 2019 रोजी ग्रेटर नोएडा (दिल्ली NCR) येथे “इंडसफूड–II 2019” मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

भारतीय व्यापार जाहिरात परिषद (TPCI) तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. खाद्यपदार्थांच्या या जागतिक सुपरमार्केटमध्ये 50 देशांमधून सुमारे 600 जागतिक खरेदीदार आणि 350 भारतीय निर्यातदार व उत्पादक भाग घेणार असल्याचे अपेक्षित आहे.