Get Mystery Box with random crypto!

भारतातील पहिल्या ‘ग्लोबल मोबिलिटी समीट 2018 मूव्ह’ चे पंतप्रधा | Pune Rooms 24×7

भारतातील पहिल्या ‘ग्लोबल मोबिलिटी समीट 2018 मूव्ह’ चे पंतप्रधानांच्या हस्‍ते 7 सप्टेंबर रोजी होणार उद्‌घाटन...

● नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे आयोजित ग्लोबल मोबिलिटी समीट-2018 मूव्ह चे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे.

● नीती आयोगातर्फे 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवस या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

● मोबिलिटी आणि संबंधित भागधारकांशी संबंधित विविध मुद्यांबाबत जनजागृती वाढविणे, हा या संमेलनामागचा मुख्य उद्देश आहे.

● या संमेलनात आंतरशासकीय संघटना, शिक्षणतज्ञ, विचारवंत आणि मोबिलिटी क्षेत्रातील धुरीणांबरोबरच संबंधित क्षेत्रांमधले अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.
( सौजन्य - pib )

"डिफेन्स ॲण्ड होमलॅण्ड सिक्युरिटी एक्स्पो आणि परिषद 2018" चे गृहमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्‌घाटन..

● "सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया"च्या सहयोगाने "पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज"तर्फे आयोजन करण्यात आले आहे.


KAZIND 2018: भारत आणि कझाकस्तान यांचा संयुक्त #युद्धाभ्यास

10 ते 23 सप्टेंबर 2018 या कालावधीत कझाकस्तानच्या ओटार येथे भारत आणि कझाकस्तान यांचा ‘KAZIND 2018’ नावाचा संयुक्त लष्करी युद्धाभ्यास आयोजित केला आहे.

संरक्षण क्षेत्रात विस्तृत सहकार्य चालवण्यासाठी या दोन देशांमधला हा तिसरा संयुक्त लष्करी युद्धाभ्यास आहे.

कझाकस्तान हा एक मध्य आशियाई देश आणि माजी सोवियत प्रजासत्ताक आहे. या देशाची राजधानी अस्ताना हे शहर आहे आणि कझाकस्तानी टेंगे हे चलन आहे.

चालू घडामोडी ;-
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

● केंद्रीय मंत्रिमंडळाने या ठिकाणी सात नवीन IIM परिसर उभारण्यास मंजुरी दिली - अमृतसर, बोधगया, नागपूर, संबलपूर, सिरमौर, विशाखापट्टणम आणि जम्मू.

● या राज्य प्रशासकीय मंडळाने 850 मेगावॉट (MW) क्षमतेच्या रतल जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी केंद्र-राज्य संयुक्त उपक्रमाची स्थापना करण्यास मान्यता दिली - जम्मू आणि काश्मीर.

● भारताच्या या स्वदेशी लढाऊ विमानात हवेतच इंधन भरण्याची पहिली मोहीम यशस्वी करून दाखवण्यात आली - तेजस.

● राष्ट्रपती राम नाथ कोविंद सप्टेंबर-18 मध्ये या तीन युरोपिय देशांच्या सरकारी दौर्‍यावर आहेत - सायप्रस, बल्गेरिया आणि झेक प्रजासत्ताक.

● भारतीय लष्कराने उंचीवर असलेल्या क्षेत्रात पाळत ठेवण्यासाठी भारत-इस्राएल निर्मित हे मानवविरहित हवाई वाहन निवडले - ‘स्पायलाइट मिनी-UAV’.

● फेसबुक कंपनी या देशात आशिया खंडातले प्रथम डेटा सेंटर उभारण्यासाठी $1 अब्जची गुंतवणूक करणार आहे - सिंगापूर.

● 2007 सालामधील टी-20 विश्वचषक विजेत्या संघातील स्टार वेगवान गोलंदाजाने निवृत्ती जाहीर केली - आर. पी. सिंग.

● या कनिष्ठ नेमबाजांनी ISSF विश्व अजिंक्यपद स्पर्धेत 10 मी. एयर रायफल मिश्र सांघिक कनिष्ठ गटात रौप्यपदके जिंकली - दिव्यांश सिंग पनवर व श्रेया अगरवाल.

● जागतिक आरोग्य संघटना (WHO) दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशाचे (SEARO) प्रादेशिक संचालक - डॉ. पूनम खेत्रपाल सिंग.

● आर.एन.पी. सिंग लिखित 'युनिफायर ऑफ इंडिया' पुस्तक कोणावर लिहिले गेले आहे - सरदार वल्लभभाई पटेल.