Get Mystery Box with random crypto!

डॉ.आरिफ अलवी पाकिस्तानचे नवे राष्ट्राध्यक्ष तेहरीक-ए-इन्स | Pune Rooms 24×7

डॉ.आरिफ अलवी पाकिस्तानचे नवे राष्ट्राध्यक्ष

तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) डॉ आरिफ अलवी यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

पाकिस्तानला नवे राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) डॉ आरिफ अलवी यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच भारताशी आणि खास म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याशी कनेक्शन आहे.

डॉ आरिफ अलवी यांचे वडील डॉ हबीब उर रेहमान इलाही अलवी एक डेन्टिस्ट होते. डॉ आरिफ अलवी यांच्या आत्मचरित्रात असलेल्या उल्लेखानुसार त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरु यांचे वैयक्तिक डेन्टिस्ट होते. पीटीआयच्या वेबसाइटवर डॉ आरिफ अलवी यांचे आत्मचरित्र उपलब्ध आहे.

अलवी कुटुंबाकडे जवाहरलाल नेहरु यांनी डॉ हबीब यांना लिहिलेली पत्रंही उपलब्ध आहेत.

‘डॉ आरिफ अलवी यांचे वडील डॉ हबीब उर रेहमान इलाही अलवी यांनी भारतात डेन्टिस्ट म्हणून प्रॅक्टिस केली.

१९४७ ला फाळणीनंतर ते पाकिस्तानात आले. कराचीमधील सद्दार येथे त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरु ठेवली. डॉ हबीब जवाहरलाल नेहरुंचे डेन्टिस्ट होते.

डॉ हबीब अलवी यांना नेहरुंनी लिहिलेली पत्रं त्यांच्या कुटुंबाकडे आहेत’, अशी माहिती पीटीआयच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.



जगातील 8 वे आश्चर्य बनणार : महाराष्ट्र सम्रुध्दी संरक्षक भिंत

जगाच्या सात आश्‍चर्यांपैकी असलेल्या ‘ग्रेट चायना वॉल’नंतर राज्य सरकार जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब संरक्षक भिंत बांधणार आहे.

नागपूर ते मुंबई या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गालगत दोन्ही बाजूने राज्य सरकार तब्बल ७०५ कि.मी.ची भिंत उभारणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

१४१० कि.मी.ची ही भिंत उभी राहिल्यास ते कदाचित जगातील आठवे आश्‍चर्य ठरेल, असे मानले जात आहे.चीनच्या भिंतीची लांबी ८,८५० कि.मी. आहे.

जगातील दुसऱ्या क्रमाकांवर राजस्थानमधील कुंभलगडची संरक्षक भिंत आहे. महाराणा प्रताप यांनी किल्ल्याभोवती ३६ कि.मी.ची ही भिंत उभारली.

मात्र समृद्धी महामार्गालगत दुतर्फा ७०५ कि.मी.ची संरक्षक भिंत उभारल्यास ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची भिंत ठरू शकते.

या भिंतीमुळे महामार्गावरील वाहतुकीतील अडथळे दूर होतील, अपघात टाळले जातील.

या महामार्गावरून द्रुतगतीने वाहने जाणार असल्याने रिकाम्या परिसरातील जनावरांचाही उपद्रव टळेल.
या महामार्गावर अनेक शहरे उभारण्यात येणार आहेत. त्यातून जोडल्या जाणाऱ्या वाहतुकीमुळे अपघातांची शक्‍यता आहे.

संरक्षक भिंतीमुळे या दुर्घटना रोखता येणे शक्‍य आहेत, असा दावाही मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, या महामार्गावर व्यावसायिक क्षेत्रे उभारली जाणार आहेत. तेथील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणेही या भिंतीमुळे रोखता येतील, असेही ते म्हणाले.