Get Mystery Box with random crypto!

सिंधुदुर्गाचे सुपुत्र उदय ललीत होणार भारताचे नवे सरन्यायाधीश ! | 🎯 पोलीस भरती कट्टा 🎯

सिंधुदुर्गाचे सुपुत्र उदय ललीत होणार भारताचे नवे सरन्यायाधीश !

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ए.व्ही. रमना यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यांच्या जागी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय ललीत यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

ते देवगड तालुक्याचे सुपुत्र असून गिर्ये-कोठारवाडी येथे त्यांचं मूळ घर आहे.

सिंधुदुर्गातील देवगड येथील उदय ललीत आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत.

27 ऑगस्ट रोजी ते भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्विकारणार आहेत.

जून 1983 मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली. उदय ललीत यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एम ए राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्ष वकिली केली. नंतर ते दिल्लीत गेले.

भावी पोलिसांचा टेलिग्राम ग्रुप
t.me/PoliceBhartiKatta