Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 87 वा वर्धापनदिन नवी मुंबई येथील का | MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 87 वा वर्धापनदिन नवी मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा

ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे, अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात. होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवताना आपल्याला समाजात दिसतात.

स्वसुख निरभिलाष:
खिद्यते लोकहेतो:

अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे, या ब्रीद वाक्याप्रमाणेच गेली 87 वर्षापासुन प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेस आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी 87 वर्षे पुर्ण झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व काळात 1 एप्रिल, 1937 रोजी झाली होती. स्वातंत्र्यापूर्वी ‘बाँम्बे व सिंध लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखल्या जाणा-या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’, असे नामकरण करण्यात आले.
आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी मा. अध्यक्ष श्री. रजनिश सेठ, मा. सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, मा. सदस्य डॉ. देवानंद शिंदे, मा. सदस्य डॉ. अभय वाघ, मा. सदस्य डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात, आयोगाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोगाचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोगाची ऐतिहासिक उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे मा.अध्यक्ष व मा.सदस्यांनी मत व्यक्त केले.
****