Get Mystery Box with random crypto!

मागील कांही दिवसापासून आयोगातील सचिव तसेच परीक्षा नियंत्रक व स | MPSC

मागील कांही दिवसापासून आयोगातील सचिव तसेच परीक्षा नियंत्रक व सहसचिव पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल तथ्यहीन स्वरुपाच्या बातम्या काही विशिष्ट वर्तमान पत्रात येत आहेत. या सर्व बातम्यांचे आयोगाकडून खंडन करण्यात येत आहे.
आयोगाने शासनाकडे केलेली मागणी व विनंती विचारात घेऊनच शासनाने आयोगातील वरील दोन्ही पदावर मंत्रालय संवर्गातील वरिष्ठ अधिकारी प्रतिनियुक्तीने नियुक्त केले आहेत. सदर दोन्ही अधिकारी मा. अध्यक्षांच्या सहमतीनेच आयोगात कार्यरत आहेत. त्यामुळे आयोगातील त्यांच्या नियुक्त्या बेकायदेशीर नाहीत हे स्पष्ट करण्यात येत आहे.
या पदावरील अधिकाऱ्यांच्या सक्रिय योगदानामुळे व आयोगातील नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे मागील जवळपास अडीच वर्षात कोविड काळातील प्रलंबित सर्व स्पर्धा परीक्षांचे आयोजन यशस्वीपणे करणे शक्य झाले आहे.
वरील दोन्ही पदावर शासनाने प्रतिनियुक्तीने केलेल्या नियुक्त्या आयोगाच्या मागणी नुसारच आहेत. सर्व उमेदवाराना आश्वस्त करण्यात येते कि आयोगाच्या सर्व परीक्षा अत्यंत सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यास आयोग कटिबद्ध आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी निश्चिंत राहावे व वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष न देता आगामी परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे.