Get Mystery Box with random crypto!

आज गुरुपौर्णिमा माझ्या गुरुबद्दल थोडस   मी विद्या पानढवळे.. | 𝐂𝗈𝗆𝖻𝗂𝗇𝖾 Exam 2023: सचिन गायकवाड .

आज गुरुपौर्णिमा माझ्या गुरुबद्दल थोडस

  मी विद्या पानढवळे..


   प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु हे वेगवेगळ्या रूपात असतात मग ते आई वडील असो मित्र-मैत्रिणी असोत बहीण भाऊ असो किंवा कोणीही असो माझा विचार केला तर माझ्या आयुष्यात दोनच गुरु आहेत ज्यांना मी खूप मानते पहिले माझे आई-वडील जे की प्रत्येकाचे पहिले गुरु असतात आणि दुसरे म्हणजे सचिन सर.

    आई वडिलांनी  मला या आयुष्यात आणलं परंतु आयुष्य जगायचं कसं त्याला योग्य वळण हे सचिन सरांनी दिल. शून्य होते मी या शून्यामधून त्यांनी मला निर्माण केल आहे मी काय आहे याची मला त्यांनी ओळख करून दिली किंवा मी काय करू शकते हे वेळोवेळी त्यांनी मला सांगितलं आहे आणि खरंच आपल्या आयुष्यामध्ये अशा एका व्यक्तीची आपल्याला खूप गरज असते जे आपल्याला कधीच चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही मग ते मित्र असो मैत्रीण असो बहीण असो भाऊ असो कोणी असो अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेच आहे आणि मी खरंच खूप नशीबवान आहे की मला सचिन सरांसारखा मित्र मिळाला ज्याला की मी गुरु पेक्षाही वरचे स्थान माझ्या आयुष्यात दिल आहे .

      तू फक्त पुढे चल मी आहे तुझ्यासोबत सर्व दिवस सारखे नसतात कशीही परिस्थिती असो आपल्याला लढायचंच आहे या गोष्टीची जाणीव मला करून दिली . कोण म्हणतं की या जगात देव नाही देवानेच अशी माणस आपल्या आयुष्यात दिलेली असतात जे आपल्याला कधीच चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाहीत नेहमी योग्य त्याच वळणावर घेऊन जात असता आणि माझ्या आयुष्यात सेम असच झाल आहे.

सचिन सरांच्या रूपात देवच माझ्या पाठीशी उभा होता म्हणून मी आज इथं आहे नाहीतर बसले असते असेच एखाद्या लायब्ररीमध्ये पुस्तकाचे पुस्तक वाचत आणि आजही तिथेच बसलेली असते कारण त्यावेळेस मी सर्व दिशेला जात होते प्रयत्न पण करत होते ध्येय कोणत्या दिशेला मला मिळेल याचा शोध घेत होते परंतु चुकीच्या मार्गाने ध्येय शोधत होते मी माझा हात पकडून मला फक्त आणि फक्त एकाच दिशेला घेऊन आले ते म्हणजे सचिन सर आणि ज्या दिशेला त्यांनी मला आणलं त्याच दिशेला माझ ध्येय होतं. म्हणून म्हणते आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी पाहिजे ना जे आपल्याला दिशा दाखवेल योग्य मार्ग दाखवेल, एक नक्की सांगेल की हजार चांदण्या शोधण्यापेक्षा तुम्ही एक चंद्र शोधा आणि खरंच धन्य ते सचिन सरांचे आई वडील ज्यांनी त्यांच्यावर एवढे चांगले संस्कार दिले आहेत की आज फक्त मीच नाही तर अशी हजारो लाखो विद्यार्थी आहेत ज्यांच्या सोबत सचिन सर आहेत आणि विश्वास ठेवा मित्रांनो ज्यांच्या सोबत सचिन सर आहेत ना तो कधीच अयशस्वी होणार नाही आणि मी फक्त या स्पर्धा परीक्षांचा विचार करून तुम्हाला बोलत नाही मी आयुष्याचा विचार करून तुम्हाला सांगते की या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात सुद्धा कधी अयशस्वी होणार नाहीत .

शेवटी एवढेच त्या देवाचे आभार मानते ज्यांनी सचिन सरांना माझ्या आयुष्यात आणले ज्यांनी की त्यांच्या विचाराने पूर्ण माझ्या आयुष्याला एक वेगळेच वळण दिले.

    सचिन सरांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मी 2021 पासून , 2 वेळा क्लार्क मेन्स ( 1 क्लिअर )  , 1 वेळा PSI मेन्स आणि ग्राउंड , 1 वेळा Tax Asst मेन्स , आणि 2 पूर्व परीक्षेचे निकाल बाकी आहेत त्यात पण बऱ्याच मेन्स ला असेल मी...आणि आतापर्यंत सचिन सर च्या टीम सोबत
6000+ पेक्षा जास्त विद्यार्थांना वैयक्तिक मार्गदर्शन केलं आहे..हे फक्त गुरू ने योग्य मार्ग दाखवल्यामुळे...

    अन्यथा एक मुलगी म्हणून आजचे माझे चित्र वेगळे असते...