Get Mystery Box with random crypto!

#mpsc #mpsc_pre महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर् | MPSC SIMPLIFIED(official)

#mpsc #mpsc_pre
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
●▬▬▬▬ ۩۞۩ ▬▬▬▬●

04 जून 2023 रोजी होणाऱ्या नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023  करिता विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सूचना.

परीक्षा वेळ

-पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-10 ते 12
-पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-03 ते 05

परीक्षा केंद्रावरती प्रवेश केल्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी. "बुबुळ ओळख ( Retina Scan)"

परीक्षेला जाताना काय घेऊन जाल?

» प्रवेशपत्र
» आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे.
» त्याच मूळ ओळखपत्राच्या दोन झेरॉक्स प्रती सोबत घेऊन जाणे.
» झेराॅक्स प्रत प्रत्येक पेपर करिता स्वतंत्रपणे सादर करायची असल्यामुळे त्याच मूळ ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रती घेऊन जावाव्यात.
» नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झालेल्या बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे.
» मुखपट(आवश्यकतेनुसार मास्क)
» हँड  सॅनिटायझरची पशवी/बॉटल आवश्यतेनुसार घेणे. (पारदर्शक असावी)
» किमान दोळ काळे बॅाल पेन(Reynolds LIQUIFLO माहितीस्तव)
» दोन-तीन पाणी बॅाटल (उन्हाळा आहे.)
» मोबाईल व इतर साहित्य ठेवण्याठी एक बॅग
» आवश्यक तेवढा जेवणाचा डब्बा
» परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व लवकर पोहचा.
» किमान सकाळी ८.३० वाजेपर्यंत केंद्रावर पोहचा.
» परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य असल्यास)
» दोन पेपरच्या मधल्या वेळेत उमेदवारांना  परीक्षा केंद्र सोडून  बाहेर जाण्यास मनाई आहे./नाही.

उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल?

» परीक्षेचे नाव व वर्ष 
» परीक्षा क्रमांक
» बुकलेट क्रमांक
» विषय सांकेतांक-
पेपर:-1=514, पेपर:-2=515.
» प्रश्नपत्रिका कोड ( दोन ठिकाणी )
» स्वत:ची सही

परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी.
हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) उमटविणे.(तशी योजना असल्यास)
» पर्यवेक्षकांची सही


सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!
WISH YOU ALL THE BEST

डॅा.अजित प्रकाश थोरबोले
नागेश नवनाथ पाटील

https://www.simplifiedcart.com