Get Mystery Box with random crypto!

#simplified_Publication महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, ग | MPSC SIMPLIFIED(official)

#simplified_Publication
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब व गट क संयुक्त (Combine) पूर्व परीक्षा 2023
●▬▬▬▬ ۩۞۩ ▬▬▬▬●

परीक्षा वार /दिनांक : शनिवार - 30 एप्रिल 202
3
परीक्षा उपकेंद्रावर कधीपर्यंत उपस्थित
      रहावे. वेळ : सकाळी 9.30 मी.

परीक्षा कक्षात (Hall) शेवटचा प्रवेश किती
      वाजेपर्यंत मिळेल : सकाळी 10.30 मी.
प्रत्यक्ष पेपरचा कालावधी : सकाळी 11 ते 12

परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु
      होण्याआधी दीड तास का उपस्थित रहाणे
      आवश्य आहे?

» उमेदवारांची तपासणी / झडती.
» शारीरिक तापमान तपासणे.
» ओळख पडताळणी करण्यास.
» बायोमेट्रिक तपासणी करणे.
» उपस्थिती (हजेरी) नोंदविणे.
» महत्त्वाच्या सुचना समजून घेण्यासाठी.


परीक्षेला जाताना काय घेऊन जाल?

प्रवेशपत्र
आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र,
      पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट
      कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र
      घेऊन जावे.
त्याच मूळ ओळखपत्राची झेरॉक्स प्रत सोबत
      घेऊन जाणे.
नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह     
      निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित
      स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास
      संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून
      नावात बदल झाल्याचा दाखला व त्याची
      छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर
      करण्यासाठी घेऊन जाणे.
» मुखपट(मास्क)
» हातमोजे(हँडग्लोज)
» हँड  सॅनिटायझरची पशवी/बॉटल  (पारदर्शक
  असावी)
किमान दोळ काळे बॅाल पेन (Reynolds
      LIQUIFLO माहितीस्तव)
» किमान 1 ते 2 पाणी बॅाटल
» मोबाईल व इतर वैयक्तिक साहित्य ठेवण्याठी
   एक बॅग
» कडाक्याचा उन्हाळा आहे. काळजी घ्या.
» परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व
   लवकर पोहचा. कारण परीक्षेच्या दिवशी ऎनवेळी
   उदभवू शकणाय्रा अडचणी अथवा आंदोलने,
   मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इ. बाबी लक्षात  
   घेऊन, विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंध
   परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक
   आहे.
» किमान सकाळी 9.30 वाजेपर्यंत केंद्रावर
   पोहचावे.
» परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ
  राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा.
  म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य  
  असल्यास)


उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल?

परीक्षेचे नाव व वर्ष 
परीक्षा क्रमांक
बुकलेट क्रमांक
विषय सांकेतांक- 1061
प्रश्नपत्रिका कोड (दोन ठिकाणी A | B | C |
      D )
स्वत:ची सही

परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा
      व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी.
हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या
      हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb
      Impression) उमटविणे. (तशी व्यवस्था
      असल्यास)

पर्यवेक्षकांची सही

» परीक्षा कालावधी संपल्यानंतर सोडविलेल्या
  प्रश्नांची (नोंदविलेल्या उत्तरांची) संख्या नमूद
  करण्याकरिता कोणताही अतिरिक्त वेळ
  देण्यात येणार नाही.


सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!

WISH YOU ALL THE BEST

डॅा.अजित प्रकाश थोरबोले
नागेश नवनाथ पाटील