Get Mystery Box with random crypto!

#environment प्रदूषणवाढीचे घटक औष्णिक वीज केंद्र ही प्रद | MPSC Grow Together

#environment

प्रदूषणवाढीचे घटक

औष्णिक वीज केंद्र ही प्रदूषणवाढीसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरली आहेत. त्यातून उत्सर्जित होणारे सल्फर, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड हे वायू पर्यावरणाला सर्वाधिक नुकसान करणारे आहेत.
त्यापाठोपाठ वाहने आणि धुलीकणांचे वाढलेले प्रदूषण धोक्यात भर घालत आहेत.
कार्बन उत्सर्जन ४२५च्या पुढे गेले आहे.

असे होतील दुष्परिणाम

गुजरात, राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी मान्सूनी वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे ४७ अंशापर्यंत गेलेले तापमान २०५०पर्यंत ५० अंशापर्यंत वाढणे निश्चित आहे. असे झाले तर त्याचे दुष्परिणाम भयावह असतील, जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण वाढेल, ज्वलनशील पदार्थांच्या उद्योगात आगी लागतील, तीव्र तापमानामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढेल, ढगफुटी, महापुराचे संकट ओढवेल, शेती नष्ट होईल, रोगराई वाढेल आणि जनजीवन विस्कळीत होऊन अर्थव्यवस्था धोक्यात येईल, अशी भीती आहे.

@mpscgrowtogether