Get Mystery Box with random crypto!

भांबवली वजराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधबा | MPSC Geography

भांबवली वजराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधबाची hiउंची 1840 फूट (560 मीटर) आहे आणि तो सरळ उभ्या दगडावरून वाहतो आणि ह्याला तीन पायऱ्या आहेत.  उरमोडी नदी ही या धबधब्याचा उगम स्थान आहे. हा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेला आहे. भांबवली वजराई धबधबा हे एक सुंदर प्रेक्षणिय स्थळ आहे. अलिकडेच त्याला शासनाने "क" वर्ग पर्यटनाचा दर्जा दिला आहे. या धबधब्यापासुन अवघ्या 5 किमी वर कास पुष्प पठार आहे. भांबवली गावापर्यंत गाडीची सोय असली तरी धबधब्यापर्यंत रस्त्याची सोय नसल्याने, काॅक्रिटीकरणापासुन हा परिसर दुर राहिला आहे. परिणामी, येथील निसर्ग सौंदर्य अभाधित राहिले आहे. आनंददायी हवामान खरोखरच आपल्याला प्रेमात पाडेल पण या ठिकाणाचे खरे आकर्षण निर्मनुष्य शांतता आहे आणि आपल्याला अडथळा आणण्यासाठी कोणतेही फेरीवाले, अवांछित मार्गदर्शक आणि कॅमेरामॅन नाहीत. धबधबा हा बारमाही स्वरुपाचा आहे आणि वर्षातील 12 महिने वाहतो.