Get Mystery Box with random crypto!

लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांच | MPSC Economics

लिंग गुणोत्तर (Sex ratio)
हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.
भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे. २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत. म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.

लिंग गुणोत्तर सूत्र = (स्त्री संख्या / पुरुष संख्या) x १०००

काही राज्यांची लिंग-गुणोत्तरे : केरळ - १०८४, तामिळनाडू - ९९६, महाराष्ट्र - ९२९, पंजाब - ८९५, दिल्ली - ८६८