Get Mystery Box with random crypto!

उद्दिष्टे कृषी व संलग्न कृषी संलग्न क्षेत्रांमध्ये सार्वजनिक | MPSC Economics

उद्दिष्टे

कृषी व संलग्न कृषी संलग्न क्षेत्रांमध्ये सार्वजनिक गुंतवणुकीचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्यांना उत्तेजन देणे

कृषी व कृषी सलग्न विषयाशी संबंधित योजनांच्या नियोजन व कार्यान्वयनामध्ये राज्यांना लवचिकता व स्वायत्तता देणे

कृषी व कृषिसंलग्न क्षेत्रांमधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे

महत्त्वाच्या पिकांना केंद्रीभूत ठेवून वैशिष्ट्यपूर्ण उपाययोजनांद्वारे उत्पादनातील तफावत कमी करणे

आणि गरजेनुसार पिके व प्राधान्यक्रमाचा विचार करून त्यांना राज्याच्या कृषी नियोजनामध्ये स्थान देणे

स्थानिक हवामान उपलब्ध तंत्रज्ञान आणि नैसर्गिक साधनसंपत्ती विचारात घेऊन जिल्हा आणि राज्याच्या कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी प्रकल्पाधारित कृषी आराखडा तयार करण्याचे राज्य शासनांना स्वातंत्र्य देणे

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी व कृषी संलग्न क्षेत्राचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत कृषी व फलोत्पादन विभागासह पशुसंवर्धन बुद्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग जलसंधारण विभाग सहकार पणन रेशीम तसेच सदर सर्व विभागाच्या अखत्यारीतील महामंडळे स्वायत्त संस्था व कृषी विद्यापीठ यांचा सहभाग आहे वरील सर्व सहभागी विभाग यंत्रणांकडून अथवा त्यांच्या अधिनस्त सहकारी संस्था खासगी गुंतवणूकदार कंपन्या इत्यादीचे प्रकल्प राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मंजुरीसह सादर करण्यात येतात.