Get Mystery Box with random crypto!

२७६). खालील विधाने लक्षात घ्या. अ) केंद्रीय कार्यकारीची सर | ◼️भारतीय राज्यघटना ◼️

२७६). खालील विधाने लक्षात घ्या.

अ) केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपतीचे ठिकाणी विहित आहे.

ब) भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रीमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही.

क) भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे.

भारताच्या राष्ट्रपतीच्या संदर्भात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

1) अ, ब
2) ब, क
3) अ, क
4) वरील सर्व

उत्तर :- 3

२७७) . राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्रीपरिषद असते व राष्ट्रपती त्या सल्ल्यानुसार कार्ये पार पाडतात.

अ) राष्ट्रपती मंत्रीपरिषदेस सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकत नाहीत.

ब) मंत्रीपरिषदेने सल्ला दिला होता काय याबाबत केवळ सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते.

क) संसदेचा सदस्य राहण्यास अनर्ह ठरल्यास व सदस्यत्वाचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी त्याने निवडणूक लढविल्यास तो निवडून आल्याचे घोषित होईपर्यंत तो मंत्री म्हणून राहू शकेल.

1) अ व ब योग्य
2) अ, क योग्य
3) ब व क योग्य
4) तिन्ही अयोग्य

उत्तर :- 4

२७८) . खालील विधाने विचारात घ्या .

अ) 42 व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आलेली नाही.

ब) मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता, या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.

1) विधान अ बरोबर, ब चुक

2) विधान अ चुक, ब बरोबर

3) दोन्हीही विधाने चुकीची

4) दोन्हीही विधाने बरोबर

उत्तर :- 4

२७९). भारतीय राज्यव्यवस्थेच्या संदर्भात खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत ?

अ) मंत्रिमंडळ संसदेला संयुक्तरीत्या जबाबदार असते.

ब) प्रत्येक मंत्री संसदेला वैयक्तिकरीत्या उत्तरदायी नसतो.

क) पंतप्रधानाला आपले सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य असते.

ड) अल्पसंख्यांकांसाठी मंत्रिमंडळात राखीव जागा असतात.

1) अ, ब आणि क
2) अ आणि क
3) ब आणि ड
4) ब, क आणि ड

उत्तर :- 3

२८०) . भारताच्या ॲटर्नी जनरल संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

अ) ते संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात.

ब) ते संसदीय समितीचे सदस्य होऊ शकतात.

क) ते संसदीय समितीमध्ये मतदान करू शकतात.

1) वरील सर्व विधाने सत्य आहेत.
2) फक्त अ सत्य आहे.
3) कोणतेही विधान सत्य नाही.
4) फक्त अ आणि ब सत्य आहेत.

उत्तर :- 4