Get Mystery Box with random crypto!

२६६). खालील बाबींचा विचार करा. अ) भारतीय राज्यघटनेनुसार भ | ◼️भारतीय राज्यघटना ◼️

२६६). खालील बाबींचा विचार करा.

अ) भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो.

ब) राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रीमंडळाकडे पाठवू शकतात परंतु पुनर्विचारानंतर मंत्रीमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही.

1) अ व ब दोन्ही बरोबर आहे.
2) अ बरोबर व ब चूक आहे.
3) ब बरोबर व अ चूक आहे.
4) अ व ब दोन्ही चूक आहे.

उत्तर :- 2

२६७). भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?

1) राष्ट्रपती
2) उपराष्ट्रपती
3) पंतप्रधान
4) गृहमंत्री

उत्तर :- 3

२६८). राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात.

1) पंतप्रधानांच्या सल्ल्याने

2) भारताच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने

3) लोकसभेच्या शिफारशीने

4) यापैकी नाही

उत्तर :- 1

२६९) . कोणत्या सरकारच्या कालखंडात ‘एक उद्योग एक संघटना’ असे घोषवाक्य बनविले गेले ?

1) काँग्रेस सरकार
2) जनता दल सरकार
3) राष्ट्रवादी काँग्रेस सरकार
4) जनता पक्ष सरकार

उत्तर :- 4

२७०). भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो ?

1) राष्ट्रपती
2) लोकसभा सभापती
3) पंतप्रधान
4) वित्त मंत्री

उत्तर :- 3