Get Mystery Box with random crypto!

२६१) . संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य राष्ट्रपती म्हणून | ◼️भारतीय राज्यघटना ◼️

२६१) . संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतो परंतु :

1) निवडणूक लढविण्यापूर्वी त्यास आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो.

2) त्याची निवड झाल्यास त्यास तत्काळ आपले पद सोडावे लागते.

3) त्यास निवडीनंतर आपल पद सहा महिन्यांच्या आत सोडावे लागते.

4) संसद सदस्य निवडणूक लढवू शकतो परंतु राज्य विधिमंडळ सदस्य निवडणूक लढवू शकत नाही.

उत्तर :- 2

२६२) . सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकाराचे परीक्षण करून काही तत्त्वे प्रस्तुत केली आहेत.

अ) दया याचना करणा-या अर्जदाराला राष्ट्रपतीव्दारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क नाही.

ब) राष्ट्रपती नव्याने पुरावे तपासू शकत नाहीत.

क) राष्ट्रपतीने या अधिकाराचा वापर आपल्या विवेकाधिन अधिकाराने करावा.

ड) राष्ट्रपती आपल्या आदेशाबाबत खुलासा करण्यास बांधील नाहीत.

इ) राष्ट्रपती त्यांना वाटणा-या अनावश्यक कठोर शिक्षेपासून मुक्तता तर देतीलच पण स्पष्ट चुकांपासूनही दोषमुक्त करू शकतील.

वरीलपैकी कोणते बरोबर नाहीत ?

1) अ, ब, क
2) ब, क
3) ड
4) ड, इ

उत्तर :- 2

२६३) . राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?

अ) दया याचना करणा-या अर्जदाराला राष्ट्रपतींव्दारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क आहे.

ब) राष्ट्रपती कोर्ट मार्शल झालेल्या गुन्हेगाराला क्षमा करू शकतात.

क) राष्ट्रपती या अधिकाराचा वापर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या सल्ल्याशिवाय करू शकतात.

ड) राष्ट्रपती सर्व पुरावे नव्याने तपासु शकतात आणि न्यायालयापेक्षा वेगळा दृष्टीकोन मांडू शकतात.

1) अ आणि ड
2) अ आणि क
3) ब आणि ड
4) ब आणि क

उत्तर :- 3

२६४) . पंतप्रधानाच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीयमंत्री राजीनामा देत असेल तर
1) राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात.

2) पंतप्रधान त्यास पदावरून काढून टाकतात.

3) पंतप्रधान स्वत:च राजीनामा देतात.

4) लोकसभा त्याच्या / तिच्या विरुद्ध ठराव पास करते.

उत्तर :- 1

२६५) . श्री चंद्रशेखर यांचा भारतीय पंतप्रधानपदाचा कालावधी ....................... होय.

1) 1977-78
2) 1987-88
3) 1989-90
4) 1990-91

उत्तर :- 4