Get Mystery Box with random crypto!

२४६) . खालील विधाने विचारात घ्या. अ) 1976 च्या 42 व्या घट | ◼️भारतीय राज्यघटना ◼️

२४६) . खालील विधाने विचारात घ्या.

अ) 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्तीने नागरिकांची मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

ब) 2002 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांची संख्या वाढून अकरा झाली आहे.

क) मूलभूत कर्तव्यांची शिफारस संथन्म समितीने केली होती.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

1) अ, ब
2) ब, क
3) अ, क
4) अ, ब, क

उत्तर :- 1

२४७). भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली ?

1) एम. सी. छागला
2) एम. हिदायतुल्ला
3) वाय. चंद्रचूड
4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 2

२४८). भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?

1) पंतप्रधान
2) राज्यपाल
3) राष्ट्रपती
4) मुख्य न्यायाधीश

उत्तर :- 3

३४९) . राष्ट्रपतींच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो ....................

अ) जर तो स्वत: उमेदवार असेल.

ब) जर त्याने बहुमत सिद्ध केले नसेल.

क) जर तो राज्यविधिमंडळाच्या वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल.

ड) जर तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल.

1) अ 2) ब 3) क 4) ड

उत्तर :- 3

२५०). खालीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे ?

अ) जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, तर लोकसभेचे सभापती नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतात.

ब) राष्ट्रपतींच्या निवडणूकीच्या संदर्भात किमान आणि कमाल वयोमर्यादा भारतीय संविधानात नमूद आहे.

क) भारतात राष्ट्रपती संसदेचा भाग आहेत.

1) अ, ब
2) ब, क
3) अ, क
4) फक्त क

उत्तर :- 4