Get Mystery Box with random crypto!

२४१) . योग्य क्रम लावा. (मुलभूत कर्तव्य) अ) राष्ट्रध्वज व | ◼️भारतीय राज्यघटना ◼️

२४१) . योग्य क्रम लावा. (मुलभूत कर्तव्य)

अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे

ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे

क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे

ड) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे

1) अ, ब, क, ड
2) अ, ड, क, ब
3) अ, ब, ड, क
4) अ, ड, ब, क

उत्तर :- 2

२४२) . ‘मुलभूत कर्तव्या’ बाबतच्या खालील विधानांचा विचार करा.

अ) म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसते.

ब) ती 42 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

क) ही कर्तव्ये राज्यघटनेच्या विभाग IV अ मध्ये व कलम 51 अ मध्ये दिली आहेत.

ड) अशीच कर्तव्ये अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

1) अ, ब
2) ब, क
3) क, ड
4) अ, ब, क

उत्तर :- 4

२४३). खालीलपैकी कशाचा मुलभूत कर्तव्यांशी संबंध नाही ?

अ) ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे.

ब) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.

क) कमकुवत घटकांच्या विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करणे.

ड) ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीय दृष्टया महत्त्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे.

1) अ, ब
2) ब, क
3) क, ड
4) फक्त ड

उत्तर :- ३

२४४). भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ?

1) डॉ. राजेंद्र प्रसाद
2) डॉ. झाकीर हुसेन
3) आर. व्यंकटरमण्‍
4) के. आर. नारयणन्

उत्तर :- 1

२४५). भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात ?

1) लोकसभेचे निर्वाचित सदस्य
2) राज्यसभेचे निर्वाचित सदस्य
3) विधानसभेचे निर्वाचित सदस्य
4) वरील सर्वच

उत्तर :- 4