Get Mystery Box with random crypto!

२३६) मुलभूत कर्तव्यांबाबत योग्य क्रम लावा. अ) सार्वभौमत्व | ◼️भारतीय राज्यघटना ◼️

२३६) मुलभूत कर्तव्यांबाबत योग्य क्रम लावा.

अ) सार्वभौमत्वाचे रक्षण

ब) राष्ट्रगीताचा सन्मान

क) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण

ड) वैज्ञानिक दृष्टिकोन

1) अ, ब, क, ड
2) ब, अ, क, ड
3) ब, अ, ड, क
4) ड, क, ब, अ

उत्तर :- 3

२३७) एका विशिष्ट मुलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी पूरक अशा सर्वोच्च न्यायालयापुढील 138 निवडयांचा उल्लेख मुलभूत कर्तव्यांविषयीच्या वर्मा आयोगाने केला आहे. खाली नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांपैकी कोणत्या मुलभूत कर्तव्याचा उल्लेख यासंदर्भात समितीने केला आहे ?

1) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रधज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

2) भारतातील जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे.

3) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे.

4) 6 ते 14 वयोगटातील बालकास शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

उत्तर :- 3

२३८) खालीलपैकी कोणते मुलभूत कर्तव्य नाही ?

1) संविधानाचे पालन करणे, संविधानातील आदर्श, संस्था व राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

2) देशाचे संरक्षण व देशसेवा करण्यास तयार राहणे.

3) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून जतन करणे.

4) पंचायत राजची निर्मिती करणे.

उत्तर :- 4

२३९) खालील विधाने लक्ष्यात घ्या :

अ) स्वर्ण सिंह समितीच्या
मुलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला.

ब) मुलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत.

क) केशवानंद भारती केस मुलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे.

वरीलपैकी कोणते / ती विधान/ ने बरोबर आहे / त ?

1) अ, ब
2) ब, क
3) अ, क
4) क

उत्तर :- 1

२४०) खालील विधाने विचारात घ्या :

अ) सरदार स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीवरून 42 व्या घटनादुरुस्तीने मुलभूत कर्तव्यांची यादी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली गेली.

ब) 2006 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीव्दारे सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मुक्त व अनिवार्य प्राथमिक शिक्षण देणे शासनासबंधनकारक केले गेले.

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

1) अ
2) ब
3) अ, ब
4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 1