Get Mystery Box with random crypto!

२३१) भारतीय राज्यघटनेत नमुद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंत | ◼️भारतीय राज्यघटना ◼️

२३१) भारतीय राज्यघटनेत नमुद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानांमधील काही शब्द
विशेषत्वाने नमुद नाहीत ते जादाचे नमुद केले आहेत अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत ?


अ) राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व देशातील कायद्याचा आदर करणे.
ब) स्त्रियांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणा-या प्रथांचा त्याग करणे.
क) सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे.
ड) आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे.
1) अ, क 2) ब 3) ड 4) सर्व

उत्तर :- 4

२३२) मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मुलभूत कर्तव्ये .................... च्या अपेक्षा आहेत.


1) मंत्रीमंडळ 2) जनता 3) प्रतिनिधी 4) सर्वोच्च न्यायालय

उत्तर :- 2

२३३) योग्य क्रम निवडा.
अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे
क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे ड) संविधानाचा सन्मान करणे
1) अ, ड, क, ब 2) ड, अ, क, ब 3) ड, ब, अ, क 4) ड, अ, ब, क

उत्तर :- 2

२३४) खालीलपैकी भारतीय नागरिकाचे कोणते मुलभूत कर्तव्य नाही ?


1) देशाचे संरक्षण करणे
2) नियमित कर भरणे
3) सहा ते 14 वर्षा दरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यास शिक्षणाच्या संधी देणे 4) एकही नाही

उत्तर :- 2

२३५) राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे ?
अ) जेव्हा राज्यघटना सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे.
ब) राज्याच्या आणि व्यक्तींच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्ये मान्य केली पाहिजेत.
क) ही कर्तव्ये मुलभूत हक्कांना पूरक आहेत.
ड) समावेशनामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकामध्ये नागरी जाणीव विकसित होईल.
वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?
1) अ
2) ब, क
3) अ, ब, क
4) सर्व

उत्तर :- 4