Get Mystery Box with random crypto!

आधुनिक लोकपालाची संकल्पना लोकपाल ह्या संस्थेला प्राचीन इतिहास | ◼️भारतीय राज्यघटना ◼️

आधुनिक लोकपालाची संकल्पना

लोकपाल ह्या संस्थेला प्राचीन इतिहास आहे. प्राचीन रोमन प्रजासत्ताकामध्ये शासकीय कारभाराचे निरीक्षण करण्यासाठी, दोन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येत असे. भारतात सम्राट हर्षवर्धनाच्या काळी (कार. ६०६−६४७) हर्षाने त्याच्या राज्याच्या निरनिराळ्या भागांत लोकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी लोकपालांची नियुक्ती केली होती. रशियात पीटर द ग्रेटच्या कारकीर्दीत (कार. १६८२−१७२५) राजाने इ.स. १७२२ मध्ये अशाच प्रकारचा एक अधिकारी नेमला होता; तथापि आधुनिक काळात अभिप्रेत असलेले अधिकारी व कार्यक्षेत्र या संस्थेच्या कक्षेत नव्हते. आधुनिक लोकपालाची संकल्पना प्रथम इ. स. १७१३ मध्ये स्वीडनच्या बाराव्या चार्ल्स राजाने (कार. १६९७–१७१८) प्रत्यक्ष कृतीत आणली. त्याने लोकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी व त्यांचे निवारण करण्यासाठी प्रथमच एका लोकपालाची नेमणूक केली. पुढे इ. स. १८०९ मध्ये तयार केलेल्या नव्या स्वीडिश राज्यघटनेत अधिकृत रीत्या आधुनिक लोकपालाचे पद निर्माण करण्यात आले. यो लोकपालाची निवड संसद चार वर्षांसाठी करते आणि दरवर्षी लोकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्याबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल लोकपाल संसदेत सादर करतो.

@MPSC_polity_imp