Get Mystery Box with random crypto!

*महाविधी लाँ स्टुडंट्स असोसिएशनच्या पुढाकारातून कर्डेलवाडी गाव | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

*महाविधी लाँ स्टुडंट्स असोसिएशनच्या पुढाकारातून कर्डेलवाडी गावात मोफत आरोग्य शिबीर*
आज आदर्श गाव कर्डेलवाडी येथे स्वर्गीय कारभारी महादू कर्डिले (प्रसिद्ध हाडवैद्य ) यांच्या चतुर्थ स्मृतिप्रीत्यर्थ मोफत आरोग्य शिबीर आम्ही कर्डेलवाडीकर फाऊंडेशन आणि महाविधी लाँ स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आले. हाडवैद्य कारभारी दादा यांनी अनेक लोकांना अधू होण्यापासून वाचवले.कित्येक लोकांना मणका , सांधेदुखी, गुडघेदुखी यापासून कायमस्वरूपी मुक्त केले. हातपाय मोडलेल्या लोकांवर शस्त्रक्रिया न करता नैसर्गिक पद्धतीने उपचार करून नवसंजीवनी दिली. दादांनी केलेल्या निरंतर लोकसेवेचा वारसा जपण्यासाठी कर्डेलवाडीत दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या वर्षी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. जि. प. प्राथमिक शाळा कर्डेलवाडीचे मुख्याध्यापक मा.श्री.दत्तात्रय सकट व स्माईल फाऊंडेशनचे डॉ.निखिल उगले यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.या मध्ये अंगदुखी, सर्दी, थंडीताप ,खोकला,पोटदुखी,हिमोग्लोबीन,रक्तदाब,शुगर यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत तपासणी केली गेली आणि औषधे देखील मोफत दिली गेली.
यावेळी लहान मुले , विद्यार्थी , महिला आणि वयोवृद्ध व्यक्ती यांची उपस्थिती लक्षणीय होती. जि. प. प्राथमिक शाळा कर्डेलवाडीच्या विद्यार्थ्यांची आवर्जून तपासणी यावेळी करण्यात आली. ग्रामीण भागातील महिलांमध्ये अशक्तपणा , हिमोग्लोबिनची कमतरता बऱ्याचदा असते.पण योग्य निदान आणि उपचार न केल्यामुळे मोठे आजार बळवतात.त्यामुळे महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.काही महिलांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता आढळल्यावर त्यांना लगेच त्याविषयी आवश्यक औषधे देण्यात आली आणि मार्गदर्शन करण्यात आले.105 लाभार्थीनी या शिबिराचा लाभ यावेळी घेतला. यावेळी स्माईल फाउंडेशनच्या टीमचा सत्कार कर्डेलवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. कर्डेलवाडी शाळेचे मुख्याध्यापक आदर्श शिक्षक मा.श्री.दत्तात्रय सकट सर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. कर्डेलवाडी गावाची ख्याती दुरदूरपर्यंत पोहचवण्यात दादांचा खूप मोठा होता. लोक बाहेरच्या राज्यातून उपचारासाठी दादांकडे येत .त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांकडे ते नेहमी शाळेविषयी बोलत.अनेक लोक शाळेला भेट देत. दादांनी स्वतः अनेकदा शाळेला मदत केली आहे. शाळेच्या प्रगतीमध्ये देखील दादांचे मोठे योगदान आहे. दादांचा समाजसेवेचा वारसा हे गाव पुढे नेत आहे याचे कौतुक आहे असे उदगार सरांनी यावेळी काढले.
सदर कार्यक्रम READ India Community Library and Resource centre मध्ये आयोजित करण्यात आला होता. या सार्वजनिक लायब्ररी मध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची , अवांतर वाचनाची पुस्तके मोफत वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर computer course आणि स्पोकन इंग्लिशचे कोर्स Avery Dennison कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून मोफत उपलब्ध करून दिले आहेत. तरी या सुसज्ज लायब्ररीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन READ India संस्थेचे प्रकल्प समन्वयक आणि महाविधी लाँ स्टुडंट्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रविण कर्डिले यांनी केले.
यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष मा.गणेश कर्डिले , किशोर कर्डिले , विक्रम कर्डिले ( हाडवैद्य ) , पोलीस पाटील अण्णासाहेब धरणे , ग्रामपंचायत सदस्य दादाभाऊ कर्डिले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण कर्डिले यांनी केले व किशोर कर्डिले यांनी उपस्थितांचे आभार मानले
.