Get Mystery Box with random crypto!

मानवी श्वसनसंस्थेची रचना: फुप्फुसे श्वसनाचा मुख्य अवयव असू | Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣

मानवी श्वसनसंस्थेची रचना:



फुप्फुसे श्वसनाचा मुख्य अवयव असून शरीरात छातीच्या पोकळीत हृदयाच्या दोन्ही बाजूस स्थित असतात.



श्वसनसंस्थेची सुरवात बाह्य नाकपुड्यांपासून होते.


पुढे त्याचे रूपांतर घसा, स्वरयंत्र आणि श्वसननलिकेत होते.


श्वसन नलिकेचे रूपांतर श्वसनात होऊन ती दोन्ही फुफ्फुसांना जोडलेली असते.



फुफ्फुसांमध्ये श्वसनीचे रूपांतर अनेक लहान शाखांमध्ये होते.


या सर्व लहान शाखांना श्वसनीका म्हणतात.


श्वसनिकांच्या टोकाशी फुग्यांसारखे दिसणारे वायुकोश (Alveoli) असतात.



वायुकोशामध्येच विसरण (Diffusion) प्रक्रियेद्वारे ऑक्सिजन आणि कार्बन डायॉकसाइड या वायूंची देवाण घेवाण होते.


वायुकोशांच्या पातळ भित्तिकांभोवती कोशिकांचे (Capillaries) जाळे असते.



फुफ्फुसात आलेल्या हवेतील ऑक्सिजन केशिकातील तांबडया पेशीतील हिमोग्लोबिन शोषून घेते तर त्याच वेळी रक्तातून कार्बन डायॉकसाईड वायुकोशात सोडला जातो.



या क्रियेलाच विसरण असे म्हणतात.


हा कार्बन डायॉकसाईड वायू उच्छवासामुळे शरीराबाहेर टाकला जातो तर ऑक्सिजन वायू शरीरातील सर्व उतींकडे पोहोचवला जातो.