Get Mystery Box with random crypto!

२) ऑक्सि / सानील श्वसन (Aerobic Respiration): ज्या श्वसन प | Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣

२) ऑक्सि / सानील श्वसन (Aerobic Respiration):



ज्या श्वसन पद्धतीमध्ये सजीव ऑक्सिजनच्या साहाय्याने पेशीमध्ये ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण करून ATP च्या स्वरूपात ऊर्जा मुक्त करतात त्यास ऑक्सि / सानील श्वसन असे म्हणतात.


मानवी शरीरात श्वसन संस्थेच्या साहाय्याने ऑक्सिजनच्या सन्निघ्यात श्वसन प्रक्रिया पूर्ण होते.



मानवी श्वसनसंस्था खालील अवयवांची बनलेली असते.


1) बाह्य नाकपुड्या (External Nostrils).


2) घसा (Pharynx).


3) ग्रसनी / स्वरयंत्र (Larynx).


4) श्वसन नलिका (Trachea).


5) श्वसनी (Bronchi) – श्वसनिका (Bronchioles).


6)  फुप्फुसे (Lungs).


7) वायुकोश (Alveoli).


8) श्वासपटल (Diaphragm).