Get Mystery Box with random crypto!

गतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्थानांतरणीय गती, घर्णून गती, | Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣

गतीचे वेगवेगळे प्रकार आहेत.


स्थानांतरणीय गती, घर्णून गती, दोलन गती.


स्थानांतरणीय गती एकरेषीय असू शकते किवा तिचा मार्ग वक्राकारही असू शकतो.


अंतर ही अदिश राशि आहे तर विस्थापन ही सदिश राशि आहे.


ज्या भौतिक राशींचे मापन दुसर्याप राशींवर अवलंबून नसते त्यांना मूलभूत राशि असे म्हणतात.


उदा. लांबी, वस्तुमान, वेळ, इ.


एखाद्या वस्तूने एकक काळात कापलेल्या अंतरास त्या वस्तूची ‘चाल’ किंवा ‘सरासरी चाल’ असे म्हणतात.



एखाधा वस्तूने एकक काळात एखाधा विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास त्या वस्तूचा वेग अथवा सरासरी वेग म्हणतात.



वेगामधील बदलाचा दर म्हणजे त्वरण होय.



जर वस्तूच्या वेगात वाढ होत असेल तर त्या वस्तूचे त्वरण धन (+ve) असते.


जर वस्तूचा वेग कमी होत असेल तर त्वरण (-ve) ऋण असते.


जी भौतिकराशी केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्ण व्यक्त करता येते तिला ‘अदिश राशी’ किवा ‘अदिश’ असे म्हणतात.



अदिश राशींची बेरीज-वजाबाकी अंकगणिताचे नियम वापरुन करता येते.



अदिश राशी-व्स्तुमान, चाल, कार्य, आकारमान, घनता, वेळ, अंतर, ऊर्जा.



जी भौतिक राशी पुर्णपणे व्यक्त करण्यासाठी तिचे परिणाम व दिशा या दोन्हींची आवश्यकता असते तिला ‘सदिश राशी’ किंवा ‘सदिश’ असे म्हणतात.


सदिश राशी – विस्थापन, वेग, त्वरण, बल, गती, वजन.



सदिश राशी दर्शविण्यासाठी डोक्यावर बाण काढलेल्या चिन्हाचा वापर केला जातो.