Get Mystery Box with random crypto!

इलेक्ट्रॉन चे वस्तुमान 0.00054859 u आहे. प्रोटॉन हा धनप्राभ | Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣

इलेक्ट्रॉन चे वस्तुमान 0.00054859 u आहे.


प्रोटॉन हा धनप्राभरित मूलकण असून त्याचा निर्देश P ह्या संज्ञेने करतात.


न्युट्रॉन हे विधूतप्रभारदृष्टया तटस्थ असलेले मूलकण आहेत.


KLMN या या कावचांमध्ये 2, 8, 18, 32 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन सामावू शकत नाहीत.


मात्र कोणत्याही अणूच्या शेवटच्या म्हणजेच सर्वात बाहेरील कवचामध्ये जास्तीत जास्त आठ इलेक्ट्रॉन सामावू शकतात.



K कवचातील इलेक्ट्रॉनची उर्जा कमी असते.



हेलियम, निऑन यांसारखी काही थोडी मूलद्रव्ये कोणत्याही अणुबरोबर संयोग न पावता मुक्त अशा अनुस्थिती मध्येच अस्तित्वात असतात.



अणूंच्या संयोग पावण्याच्या शक्तीला संयुजा असे म्हणतात.


संयुजा हा अणूचा मूलभूत रसायनिक गुणधर्म आहे.



अणूच्या बाहयतम कवचाला त्याचे संयुजा कवच असे म्हणतात.



ज्यांचे संयुजा कवच पूर्ण भरलेले असते अशा अणूची संयुजा शून्य असते.



बारा न्यूक्लिऑन असलेल्या कार्बन अणूचे जे वस्तुमान त्याच्या 1/12 एवढे वस्तुमान म्हणजे एक अणुवस्तुमान एकक (a.m.u.) होय.



अणुवस्तुमानांक A या संज्ञेने दर्शविला जातो.