Get Mystery Box with random crypto!

अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण असतात. त्यांना एकत्र | Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣

अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण असतात.


त्यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात.


प्रोटॉन व न्युट्रॉन हे त्याचे दोन प्रकार आहेत.


केंद्राबाहेरील भाग हा ऋण प्रभारीत इलेक्ट्रॉन व खूप मोकळी जागा यांचा बनलेला असतो.


केंद्राबाहेरील सर्व इलेक्ट्रॉनवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनपरभारा एवढाच असल्यामुळे अणू हा विधूतप्रभारदृष्ट्या उदासीन असतो.


पूर्वी अणूत्रिज्येसाठी अॅगस्ट्रोम (A० = 10 -8 cm) हे एकक वापरात होते.


आता अॅगस्ट्रोमच्या जागी पिकोमीटर (pm) हे एकक वापरात आहे.


(1 pm = 10 -12 m).


अणूवस्तूमानांक दर्शविण्यासाठी खास असे अणूवस्तुमान एकक डाल्टन वापरले जाते. (u).



इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित मूलकण असून त्याचा निर्देश e असा करतात.