Get Mystery Box with random crypto!

कायेच्या कल्पवृक्षावरून चैतन्याचा स्वर्गीय पक्षी स्वर्गात उडून | मराठी साहित्य UPSC

कायेच्या कल्पवृक्षावरून चैतन्याचा स्वर्गीय पक्षी
स्वर्गात उडून जाण्यापूर्वीच ये.
तू तात्काळ आलास तर अन् तुझा कोमल कर
माझ्या जळत्या जीवाला लागला तर
उरीची संपेल क्षणी जळजळ
बुजतील वळ युगायुगाचे
विरतील ओहळ जुन्या जखमांचे मनामनातले
होईन मी शुद्ध चांगलासा तरुण
कधी कबीर,कधी उमर खय्याम
गेला ज्या चितारुन
मरुन मी मेघासारखा संचारेन वार्‍यावरती
कधी गिरीच्या शिरी राहून
उभा गाईन गीते लखलखती." *

मात्र एवढ्या मोठ्या लेखकाला आयुष्याच्या शेवटी स्वत:च्या आजारावर उपचार करण्यासाठी पैशाची व्यवस्था होऊ शकली नाही. स्वत:कडची असलेली, विकत घेतलेली, पुस्तके विकून उपचार करून घ्यावा लागला. या पेक्षा मोठे दुर्दैव काय ? असो....!!!
संदर्भ: दलित साहित्य वेदना आणि विद्रोह - भालचंद्र फडके.
श्रीविद्या प्रकाशन