Get Mystery Box with random crypto!

सार्वनामिक विशेषण : सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार् | मराठी व्याकरण

सार्वनामिक विशेषण :

सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.
उदा.

हे झाड

ती मुलगी

तो पक्षी

मी, तू, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे अशावेळी नेहमीच मूळ स्वरुपात न येता सर्वनामास विभक्तीची प्रत्यय लागून त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो.


मी – माझा, माझी,

तू – तुझा, तो-त्याचा

आम्ही – आमचा, तुम्ही-तुमचा, ती-तिचा

हा – असा, असला, इतका, एवढा, अमका

तो – तसा, तसला, तितका, तेवढा, तमका

जो – जसा, जसला, जितका, जेवढा

कोण – कोणता, केवढा