Get Mystery Box with random crypto!

उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू यांनी १३ डिसेंबर १९४६ रोजी घ | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

उद्दिष्टांचा ठराव

पंडित नेहरू यांनी १३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला.

२२ जानेवारी १९४७ रोजी हा ठराव घटना समितीने एकमताने मंजूर केला.

या ठरावाने घटना समितीला दिशा देण्याचे आणि तिचे तत्त्वज्ञान स्पष्ट करण्याचे कार्य केले.

त्यातील काही तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत

भारत हे एक सार्वभौम, प्रजासत्ताक गणराज्य असेल.
सत्तेचे उगमस्थान – भारतीय जनता आहे.
सर्व लोकांना न्याय, स्वातंत्र्य, समता इ.ची हमी व संरक्षण दिले जाईल.
अल्पसंख्याक, मागास आदिवासी, वंचित व मागासवर्ग यांच्यासाठी संरक्षक तरतुदी असतील.
राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाईल.
━━━━━━━━
माहिती संकलन:- धम्मपाल सर, पुणे
Join @Polity4all