Get Mystery Box with random crypto!

विद्यार्थी मित्रहो, सन 2019-20 / 2020-21 या कालावधीत अनेक विद | Dayanand Junior College [Official]

विद्यार्थी मित्रहो,

सन 2019-20 / 2020-21 या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप फॉर्म वेळेत भरले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची पूर्ण फी भरावी लागलेली आहे.

चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप / फ्रीशिप / ईबीसी फॉर्म वेळेपूर्वी भरावेत.

जे विद्यार्थी लवकर फॉर्म भरतील त्यांचे फॉर्म शासन स्तरावरून लवकर मंजूर होतील. जर त्यात काही त्रुटी असेल तर तेही वेळेत आपणास समजू शकेल त्यासाठी विद्यार्थ्यानी वेळेपूर्वी ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी आधार कार्ड ला / स्कॉलरशिप फॉर्मसाठी स्वतःचा मोबाइल नंबर द्यावा जेणेकरून स्कॉलरशिप विषयी येणारे SMS तुम्हाला समजू शकतील. अनेक विद्यार्थी पालकांचा मोबाईल क्रमांक देतात त्यांचा फॉर्म काही कारणाने परत आला तर त्याचा मेसेज पालकांना समजत नाही किंवा विद्यार्थ्या पर्यंत मिळत नाही. त्यामुळे स्वतःचा मोबाईल क्रमांक अपडेट करावे.

जे विद्यार्थी स्वतः स्कॉलरशिप फॉर्म ऑनलाइन भरू शकत नाहीत त्यांनी महाविद्यालय कॅम्पस मधील दयानंद ई सेवा केंद्र (कॉलेज कॅन्टीन शेजारी) येथे फॉर्म भरावेत. या ठिकाणी अचूक फॉर्म भरले जातात. जेणेकरून तुमचा फॉर्म reject होणार नाही. फॉर्म मध्ये दुरुस्ती असल्यास असल्यास पुनश्च कसलेही चार्ज आकारले जात नाहीत.

घरबसल्या 9823158238 या क्रमांक वर व्हाट्सअप्प वर आवश्यक ती माहिती पाठविल्यास ऑनलाइन फॉर्म भरून फॉर्म चे PDF व्हाट्सअप्प केले जाईल.

स्कॉलरशिप फॉर्म ऑनलाइन भरल्यानंतर त्याची हार्डकॉपी महाविद्यालयात जमा करण्याची आवश्यकता नाही विद्यार्थ्याने फॉर्म चे प्रिंट किंवा PDF स्वतःकडे जपून ठेवावे.

हा मेसेज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.