Get Mystery Box with random crypto!

बारावी वर्गाची ऑनलाइन प्रवेश फी भरत असताना विद्यार्थ्यांनी खाल | Dayanand Junior College [Official]

बारावी वर्गाची ऑनलाइन प्रवेश फी भरत असताना विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी काळजीपूर्वक लक्षात घ्याव्यात.

1. विद्यार्थ्याने 12वी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रवेश समिती आपला अर्ज पडताळणी करून तुमच्या मोबाईल वर ऑनलाइन फी भरण्यासाठी लिंक पाठवते.

2. जोपर्यंत तुम्हाला प्रवेश फी भरण्यासाठी लिंक येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश फी भरू नये.

3. Feepayr.com या लिंक वर काही विद्यार्थ्यांना 11वी वर्गाची फी (ड्युज) दाखवत आहे. सदर फी विद्यार्थ्यांनी भरू नये. ही फी अनचेक करून फक्त 12वी ची फी भरावी.

4. फायनल फी भरण्यापूर्वी आपण किती व कोणत्या वर्गाची फी भरतोय याची खात्री करूनच फी भरावी.

5. नजरचुकीने 11वी ची फी भरली गेल्यास सदर फी परत मिळण्यासाठी महाविद्यालयात अकाउंट ऑफिस मध्ये नंतर अर्ज देऊन फी परत मिळवू शकता.