Get Mystery Box with random crypto!

तालिबानचे मूल्यमापन कृतींवरून’. तालिबानच्या वर्तनाचे मूल्यमा | CrackedSoft

तालिबानचे मूल्यमापन कृतींवरून’.

तालिबानच्या वर्तनाचे मूल्यमापन त्यांच्या बोलण्यावरून नव्हे तर कृतींवरून केले जाईल असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जी ७ बैठकीच्या अगोदर केले आहे. अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी ही आभासी बैठक होत आहे.

तालिबानने अफगाणिस्तानातील सत्ता १५ ऑगस्ट रोजी हस्तगत केली असून अध्यक्ष अशरफ घनी यांना देशातून पलायन करावे लागले होते.

दरम्यान, डाउनिंग स्ट्रीटने म्हटले आहे की, जॉन्सन यांनी जी ७ देशांची बैठक बोलावली असून त्यात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान व अमेरिका यांचा समावेश आहे. या देशांनी अफगाणिस्तानच्या पाठीशी उभे रहावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ब्रिटनने अफगाणिस्तानला आधीच मदत केली आहे तशीच इतर देशांनीही केली आहे, असे सहकार्य पुढेही चालू ठेवण्याची आवश्यकता जॉन्सन यांनी व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तानात मानवी हक्कांचे संरक्षण करून त्या भागात स्थिरता प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याला आपले प्राधान्य राहील, असेही त्यांनी म्हटले आहे, अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत संयुक्त दृष्टिकोन असावा यासाठी जी ७ देशांची परिषद बोलावल्याचे जॉन्सन यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी ब्रिटन सदैव तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.