Get Mystery Box with random crypto!

अफगाणिस्तानातून माघारीचा निर्णय तर्कसंगत - बायडेन. अमेरिके | CrackedSoft

अफगाणिस्तानातून माघारीचा निर्णय तर्कसंगत - बायडेन.

अमेरिकेच्या अफगाणिस्तान विषयक धोरणावर टीका होत असतानाच अध्यक्ष जो बायडेन यांनी, ‘‘सैन्य माघारीचा निर्णय तर्कसंगत आणि योग्यच होता’’, असे समर्थन केले आहे.

तालिबानने १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानातील सत्ता हस्तगत केली असून अमेरिकेचे सैन्य माघारी जाण्याच्या दोन आठवडे आधीच तालिबानने काबूलचा ताबा घेतला. सैन्य माघारीच्या निर्णयावरून विरोधी रिपब्लिकन पक्षाने बायडेन यांच्यावर टीका केली होती. त्यांनी सैन्य माघारीची घाई केल्यानेच तालिबानने सत्ता काबीज केली असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु बायडेन यांनी सैन्य माघारीच्या निर्णयाचे समर्थन केले असून त्यांनी रविवारी व्हाइट हाऊस येथे वार्ताहरांना सांगितले की, आपला निर्णय विवेकी आणि तर्कसंगत होता याचीच नोंद इतिहासात होईल.

‘३१ ऑगस्टपर्यंत सैन्यमाघार अशक्य’ - अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीची घोषणा केली असली तरी ब्रिटन आणि युरोपीय महासंघाच्या म्हणण्यानुसार ते अशक्यप्राय आहे. अफगाणिस्तानातून एका आठवडय़ात सर्व सैन्य परत आणणे अवघड असल्याचे युरोपीय महासंघाने म्हटले आहे, तर बायडेन यांच्यावर मुदत पाळण्याबाबत दबाव आहे. रविवारी बायडेन यांनी सैन्यमाघारीचे समर्थन करताना मुदतवाढीचेही संकेत दिले होते.