Get Mystery Box with random crypto!

डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज 5.0.. संरक्षण मंत्री राजना | CrackedSoft

डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज 5.0..

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते 19 ऑगस्ट 2021 रोजी ‘इनोवेशन फॉर डिफेंस एक्सलेंस-डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन’ (iDEX-DIO) अंतर्गत “डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज (DISC) 5.0” याचा प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अंतर्गत संरक्षण सेवांच्या 13 आणि संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (DPSUs) 22, अशा एकूण 35 समस्या विवरणचे DISC 5.0 अंतर्गत अनावरण करण्यात आले. परिस्थितीजन्य जागृती, वर्धित वास्तविकता, कृत्रिम बुद्धिमत्ता, विमान-प्रशिक्षक, घातक नसलेली उपकरणे, 5G नेटवर्क, पाण्याखालील क्षेत्रासंबंधी घटकांविषयी जागृती, ड्रोनचा झुंड आणि माहिती संकलन या विषयांसंबंधी या समस्या आहेत.

विजेत्यांना iDEX कडून 1.5 कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान, भागीदार इनक्यूबेटर संस्थांकडून सहाय्य आणि अंतिम वापरकर्ते असलेल्या नोडल अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळते.

DISC 5.0 हा 'आत्मनिर्भर' संरक्षण क्षेत्र निर्माण करण्याचा भारत सरकारचा एक प्रयत्न आहे. या उपक्रमातून तरुण उद्योजक आणि नवसंशोधक भारताला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी अभिनव संशोधन, संरचना आणि विकासाला नव्या उंचीवर नेतील.

जगातील झपाट्याने बदलणारी भौगोलिक-राजकीय आणि सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन एक मजबूत, आधुनिक आणि सुसज्ज लष्कर आणि तितकेच सक्षम आणि स्वयंपूर्ण संरक्षण उद्योग निर्माण करण्याचे महत्त्व संरक्षण मंत्रालयाने अधोरेखित केले आहे.

iDEX विषयी...

‘इनोवेशन फॉर डिफेंस एक्सलेंस-डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन’ (iDEX-DIO) हे एक व्यासपीठ असून त्यात सरकार, सेवा, धोरणकर्ते, उद्योग, स्टार्टअप आणि नवसंशोधक एकत्र काम करून संरक्षण आणि विमानचालन क्षेत्रांना पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करू शकतात. ही विशिष्ट क्षेत्रात तंत्रज्ञान विकास आणि संभाव्य सहकार्यावर देखरेख ठेवणारी संस्था म्हणून काम करते.

याची रचना लष्करी युद्धात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सेवा दलांच्या गरजांशी जवळून जोडण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी करण्यात आली आहे.