Get Mystery Box with random crypto!

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या | CrackedSoft

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे केंद्रीय सांस्कृतिक कार्य विभागाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोमवारी लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले.

भाजपचे लोकसभेतील खासदार गोपाल शेट्टी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर मेघवाल यांनी सांगितले, की या विषयावर विचार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून आतापर्यंत देशातील तमिळ, संस्कृत, कन्नड, मल्याळम, ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय विचाराधीन असून त्याबाबत वेगाने हालचाली करण्यात येत आहेत. केंद्र सरकार त्याबाबत सकारात्मक आहे असे मंत्री मेघवाल यांनी लोकसभेत बोलताना नमुद केले आहे.

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी ही माहिती दिली. त्या वेळी सभागृहात विरोधकांकडून पेगॅसस पाळत प्रकरण आणि इतर प्रश्नांवरून गोंधळ सुरू होता. कुठल्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी ती १५०० ते २००० वर्षे जुनी आहे हे ऐतिहािक पुराव्यांच्या मदतीने सिद्ध करावे लागते. त्या भाषेची मूळ परंपरा पाहिली जाते. ती एखादी भाषा बोलणाऱ्या समुदायाकडून उचललेली नाही किंवा त्याची नक्कल नाही हेही शोधावे लागते.