Get Mystery Box with random crypto!

.                 लक्षात ठेवा १) महाराष्ट्रातील सहकारी तत् | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

.                 लक्षात ठेवा

१) महाराष्ट्रातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना प्रवरानगर, अहमदनगर येथे उभा राहिला. कोणत्या वर्षी ?
- सन १९४८

२) विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून 'जिजामाता सहकारी साखर कारखान्या'चा उल्लेख करावा लागेल. हा साखर कारखाना कोठे आहे ?
- दुसरबीड (बुलढाणा)

३) मैसुरू येथील वृंदावन गार्डन व काश्मीरमधील शालिमार उद्यान यांच्या धर्तीवर रचना करण्यात आलेले पैठण येथील उद्यान कोणते ?
- ज्ञानेश्वर उद्यान

४) आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे 'सागरीय उद्यान' सिंधुदुर्ग जिल्ह्यात .... परिसरात साकारले जात आहे.
- मालवण

५) महाराष्ट्रातील तसेच भारतातीलही पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान .... या जिल्ह्यास मिळाला आहे.
- सिंधुदुर्ग
.

6) सन १८७८ मध्ये बांधून पूर्ण झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत इंग्रजांच्या .... या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणता येईल .
- गॉथिक

7) आता 'छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस' म्हणून ओळखले जाणारे व्हिक्टोरिया टर्मिनस या इटालियन गॉथिक शैलीने बांधलेल्या रेल्वे स्टेशनच्या वास्तुरचनेचे श्रेय कोणास दिले जाते ?
- एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स

8) मुंबई उपनगर जिल्ह्यातून जाणारा पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे) .... नावाने ओळखला जातो.
- अली यावर जंग मार्ग

9) मुंबई उपनगरातून जाणाऱ्या ..... महामार्गास 'वसंतराव नाईक महामार्ग' म्हणून ओळखले जाते.
- पूर्व द्रुतगती महामार्ग (इस्टर्न एक्स्प्रेस हायवे )

10) मुंबई येथील 'ऑगस्ट क्रांती मैदान' पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते ?
- गवालिया टैंक मैदान


ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की शेयर करा

सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..
https://chat.whatsapp.com/K39LkXCaq45E7BVGRYAbbM