Get Mystery Box with random crypto!

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी प्रथमच कृष्णवर् | 🔰 Current Affairs Marathi 🔰

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी प्रथमच कृष्णवर्णीय महिला

अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयात एका कृष्णवर्णीय महिलेची न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे. केतनजी ब्राऊन जॅक्सन असे या महिलेचे नाव आहे. जॅक्सन या सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झालेल्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. जॅक्सन न्यायमूर्ती स्टीफन ब्रेयर यांची जागा घेतील. जॅक्सन यांच्या नियुक्तीमुळे आता सर्वोच्च न्यायालयात प्रथमच चार महिला न्यायमूर्ती असतील. त्यापैकी दोन कृष्णवर्णीय न्यायमूर्ती आहेत.  

अमेरिकेच्या दृष्टीने ही घटना मैलाचा दगड आणि अध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी विजयाचा क्षण असल्याचे मानले जाते. बायडेन यांनी निवडणूक प्रचारात तसे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पूर्ण केले.
----------------------------------------------------------
अधिक चालू घडामोडींसाठी आजच जॉईन करा @ChaluGhadamodi